आठवड्याला 52 तासांपेक्षा अधिक काम केल्यास केसांवर होतात हे परिणाम

शहरातील लोकांच्या अनेक समस्येंपैकी एक समस्या म्हणजे केस गळणे ही आहे. 25 पार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात केस गळण्यास सुरूवात होते. एका नवीन अभ्यासात समोर आले आहे की, आठवड्याला 52 तासांपेक्षा अधिक काम करणाऱ्या व्यक्तींचे इतरांच्या तुलनेत अधिक केस गळतात.

दक्षिण कोरियातील Sungkyunkwan University School of Medicine ने पुरूषांच्या केस गळण्यावर आणि कामाच्या तासांवर अभ्यास केला आहे.

वैज्ञानिकांना अभ्यासात दिसून आले की, 40 तास काम करणाऱ्या पुरूषांच्या तुलनेत 52 तासांपेक्षा अधिक काम करणाऱ्या पुरूषांचे केस दुप्पट पटीने गळतात.

या अभ्यासात 13 हजारांपेक्षा अधिक पुरूषांनी भाग घेतला होता. सहभागी झालेल्या पुरूषांना 3 गटात विभागण्यात आले होते. हे गट 40 तास काम करणारे (नॉर्मल), 40 ते 52 तास काम करणारे (लाँग) आणि 52 तासांपेक्षा अधिक काम करणारे (मच लाँगर) असे होते.

या अभ्यासात Catagen Phase (असा टप्पा जेव्हा केसांची वाढ थांबते) यावर रिसर्च करण्यात आला. यामध्ये दिसले की, तणावामुळे ही फेस लवकर येते व केसांची वाढ थांबते.

 

Leave a Comment