The Broken News Trailer: या तारखेला ZEE5 वर प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या वेब सीरिजमध्ये पहा सोनाली बेंद्रेचा दमदार अंदाज


माधुरी दीक्षित आणि रवीना टंडननंतर आता सोनाली बेंद्रे देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोनाली डिजिटल प्लॅटफॉर्मवर ZEE5 ची वेब सिरीज ‘द ब्रोकन न्यूज’ द्वारे पदार्पण करत आहे. त्याचबरोबर अभिनयातही बऱ्याच कालावधीनंतर ती या मालिकेद्वारे पुनरागमन करणार आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज करण्यात झाला.

काय आहे कथा
द ब्रोकन न्यूजची कथा दोन प्रतिस्पर्धी न्यूज नेटवर्क्सभोवती फिरते आणि पत्रकारितेच्या जगात खोटे, प्रेम आणि संघर्ष समोर आणते. आवाज भारती एक स्वतंत्र आणि नैतिक वृत्तवाहिनी आहे, ज्याचे नेतृत्व तिच्या मुख्य संपादक अमिना कुरेशी (सोनाली बेंद्रे) करतात.

जोश 24/7 न्यूजचे मुख्य संपादक दिपंकर सन्याल (जयदीप अहलावत) आहेत. टीआरपीनुसार भारतातील नंबर 1 न्यूज चॅनेल, परंतु सनसनाटी आणि आक्रमक पत्रकारितेवर विश्वास ठेवतो. या दोन टोकाच्या पात्रांमध्ये राधा भार्गव (श्रेया पिळगावकर) आहे, जी नैतिक पत्रकारितेवर विश्वास ठेवते, परंतु तिच्यावर येणाऱ्या निर्बंधांमुळे निराश आहे.


पूर्ण स्टार कास्ट
या सिरीजमध्ये जयदीप अहलावत, श्रेया पिळगावकर, तारुक रैना, इंद्रनील सेनगुप्ता, फैसल रशीद, किरण कुमार, आकाश खुराना आणि संजीता भट्टाचार्य यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बीबीसी स्टुडिओज इंडिया निर्मित आणि विनय वैकुल दिग्दर्शित ही सिरीज लोकप्रिय ब्रिटीश मालिका ‘प्रेस’ चे अधिकृत रूपांतर आहे. ‘द ब्रोकन न्यूज’ 10 जून रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये Zee5 वर प्रदर्शित होईल.

शोबद्दल बोलताना सोनाली बेंद्रे म्हणते, संपूर्ण टीम आणि माझे अप्रतिम सहकलाकार जयदीप आणि श्रेया यांनी मला अभिनयात पुनरागमन करण्याचा एक अद्भुत अनुभव दिला आहे. आम्ही जे तयार केले आहे, ते तुम्हा सर्वांसमोर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. जयदीप अहलावत म्हणतात, मला गुंतागुंतीची आणि स्तरित पात्रे एक्सप्लोर करायला आवडतात आणि दीपंकर सन्याल हे असेच एक स्वप्नवत पात्र आहे. आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे आहोत आणि म्हणूनच कदाचित हे पात्र साकारताना खूप मजा आली.