Video : केंब्रिजमध्ये भारतीय अधिकाऱ्याने राहुल गांधींना शिकवला राष्ट्रवादाचा धडा


नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लंडन दौऱ्यावर असून, ते तेथे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून देशात राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, केंब्रिज विद्यापीठात त्यांच्या भाषणादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याने त्यांना भारत आणि चाणक्याच्या राष्ट्रवादाचा धडा शिकवला. याचा व्हिडिओ स्वतः अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

लंडन दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी सर्वप्रथम ‘आयडियाज फॉर इंडिया’ परिषदेला हजेरी लावली. यानंतर सोमवारी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी जे व्हिजन बनवत आहेत, ते सर्वसमावेशक नाही, त्यांची दृष्टी देशाच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाला वगळते. हे अन्यायकारक आणि भारताच्या कल्पनेच्या विरोधात आहे. कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये ‘इंडिया अॅट 75’ या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हिंदू राष्ट्रवाद, काँग्रेस पक्षातील गांधी कुटुंबाची भूमिका आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांसह देशातील लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली.


केंब्रिजचे संशोधन अभ्यासक आहेत सिद्धार्थ वर्मा
भारतीय नागरी सेवा अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांनी व्हिडिओ शेअर करुन त्यांनी केंब्रिज कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींच्या विचारांना कसे योग्य उत्तर दिले ते सांगितले. वर्मा हे भारतीय रेल्वेचे वाहतूक सेवा अधिकारी आहेत आणि सध्या ते केंब्रिज विद्यापीठात ‘पब्लिक पोलिस’ या विषयावर कॉमनवेल्थ रिसर्च फेलो आहेत.

संविधानाची प्रस्तावना वाचा
वर्मा यांनी राहुल गांधींना सांगितले की, ‘तुम्ही राज्यघटनेच्या कलम 1 चा संदर्भ देत भारत हे राज्यांचे संघराज्य असल्याचे सांगितले आहे, परंतु तुम्ही घटनेचे मागचे पान उलटून प्रस्तावना पाहिली तर त्यात नमूद आहे की भारत हा एक राज्य आहे. राज्यांचे संघटन, राष्ट्र आहे. भारत ही जगातील सर्वात जुनी जिवंत संस्कृती आहे. राष्ट्र हा शब्द वेदांमध्ये आहे. आपल्याकडे खूप जुनी सभ्यता आहे. चाणक्याने तक्षशिला येथे विद्यार्थ्यांना शिकवले, तेव्हाही त्यांनी त्यांना हे स्पष्ट केले की ते वेगवेगळ्या जनपदांचे असू शकतात, परंतु शेवटी ते एकाच राष्ट्राचे आहेत, ते भारताचे आहेत. वर्मा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते असे म्हणताना ऐकू येत आहेत.