या हॉटेलमध्ये पिण्यासाठी टॉयलेटचे रिसायकल्ड पाणी

तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि जर तुम्हाला पिण्यासाठी टॉयलेटमधील पाणी दिले तर ? तुम्ही पुन्हा त्या हॉटेलकडे वळून देखील बघणार नाही. मात्र पाण्याची टंचाई लक्षात घेता, भविष्याचे दृष्टीने बेल्जियममधील एक हॉटेल येणाऱ्या ग्राहकांना वापरण्यासाठी सिंक आणि टॉयलेटमधील पाणी रिसायकल करून देत आहे. हॉटेलने यासाठी एक नवीन प्रकारच्या वॉटर प्युरिफायरचा वापर केला आहे.

कुर्ने येथील ‘Gust’eaux’ हॉटेलमध्ये ग्राहकांना हे रिसायक्लड पाणी देण्यात येत आहे. या पाण्याला काहीही वास नाही, चव किंवा कोणताही रंग देखील नाही. त्यामुळे हे पाणी कोठून आले हे शोधणे अवघड आहे. यासाठी हॉटेलमध्ये पाच स्तरीय प्युरिफायर लावले आहेत. हे प्युरिफायर पाणी साफ करते व पिण्या योग्य बनवते. हे पाणी केवळ स्वच्छ केले जात नाही तर पिण्यासाठी यातील मिनरल्सचे प्रमाण देखील कायम ठेवण्यात येते.

या हॉटेलची पाईपलाईन कोणत्याच सीवेज सिस्टमशी जोडलेली नाही. त्यामुळे पाणी मोकळ्यात सोडण्यापेक्षा हॉटेल हे पाणी रिसायकल करते. पाणी आधी प्लांट फर्टिलायजरमध्ये स्वच्छ केले जाते. त्यानंतर त्यात पावसाचे पाणी मिसळले जाते. त्यानंतर प्युरिफायरमध्ये पाठवले जाते.

हॉटेलमध्ये हे पाणी ग्राहकांना मोफतमध्ये दिले जाते. याशिवाय याचा वापर आइस क्यूब, बिअर आणि कॉफी बनवण्यासाठी देखील केला जातो.

Leave a Comment