फिरायची आवड? ही कंपनी देणार दर आठवड्याला 1.84 लाख

तुम्हाला चांगला पगार असेल आणि तुमची भरपूर सेव्हिंग झाली असल्यावर तुम्ही काय करता अनेक जणांचे उत्तर असेल की, शॉपिंग करतो, फिरायला जातो, लग्झरी हॉटेल्समध्ये मस्त इन्जॉय करतो. मात्र कल्पना करा, जर याच सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कोणी नोकरी दिली तर आणि याचबरोबर तुम्हाला दर आठवड्याला 1.84 लाख रूपये पगार देखील दिला तर ?

असे झाले तर हे नक्कीच एखाद्या ड्रीम जॉब पेक्षा कमी नसेल. एक लग्झरी कंपनी hushhush.com अशी नोकरी देत आहे. ही कंपनी लग्झरी ट्रॅव्हल आणि प्रॉपर्टी डिल्स क्षेत्रात काम करते. या कंपनीला 5 ते 10 अशा लोकांची गरज आहे, जे जगभरातील लग्झरी घरामध्ये राहतील व त्याचा रिव्यू देतील. रिपोर्टनुसार, होम टेस्टरची नोकरी करणाऱ्याला वर्षाला 10 ते 15 अशा लग्झरी प्रॉपर्टीमध्ये राहून त्याचा रिव्यू करावा लागेल.

कंपनीच्या वेबसाइडवर ज्या लग्झरी प्रॉपर्टीजचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामध्ये स्पेनमधील 25 खोल्यांचा एक व्हिला, फ्लोरिडामधील ओशन रिफ क्लब आणि सॅन फ्रांसिस्कोमधील 14000 स्केअर फूटच्या मॅनशनचा समावेश आहे.

नोकरीसाठी अटी –

कंपनीने नोकरीसाठी आवश्यक पात्रता काय असेल ते देखील सांगितले आहे. यासाठी अर्ज करणाऱ्यांवर कोणताही गुन्हा नसावा. पासपोर्ट अप-टू-डेट असणे गरजेचे आहे. लिहिण्याची आवड आणि शॉर्ट नोटिसवर देखील काम करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. जर तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगर असाल आणि नियमित रिव्यूज लिहित असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच एक सुवर्णसंधी आहे.

Leave a Comment