सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर 8 महिन्यांनी प्रदर्शित झाले त्याचे शेवटचे गाणे, यातील अपूर्ण प्रेमकहाणी पाहून तुम्हाला देखील येईल रडू


‘बिग बॉस’ विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाने त्याचे कुटुंब, चाहते आणि मित्र हादरले. सिद्धार्थच्या निधनाला जवळपास 8 महिने उलटले आहेत, पण आजही तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. आजही त्याचे चाहते आणि कुटुंबीय सिद्धार्थच्या निधनाच्या दु:खातून सावरलेले नाहीत. यादरम्यान, त्याचे चाहते सिद्धार्थशी संबंधित आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनानंतर 8 महिन्यांनी त्याचे शेवटचे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सिद्धार्थला पाहून त्याचे चाहते पुन्हा भावूक होताना दिसत आहेत.

सिद्धार्थ शुक्लाच्या या गाण्याचे बोल आहेत- ‘जीना जरूरी है’. या गाण्यात सिद्धार्थ शुक्लासोबत ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक विशाल कोटीयनही दिसत आहे. व्हिडिओमध्ये विशाल सिद्धार्थ शुक्लाच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. या गाण्यात चाहत्यांना सर्वात भावूक करणारी गोष्ट म्हणजे या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्ला गळ्यात हार घातलेला दिसत आहे.

दुसरीकडे गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यात एक छोटीशी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे जी अपूर्ण राहिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिद्धार्थ शुक्ला गाण्यात एका मुलीवर (दीपिका त्रिपाठी) प्रेम करत आहे, पण हे प्रेम अपूर्णच राहते. त्याच वेळी, विशालला माहित नाही की तो चिच्या प्रेमात पडला होता, ती त्याच्या मोठ्या भावावर म्हणजेच सिद्धार्थवर प्रेम करत आहे. हे गाणे पाहून चाहत्यांचे डोळे पुन्हा एकदा पाणावले आहेत. त्याचवेळी ‘जीना जरूरी है’ हे गाणे काही काळापूर्वी रिलीज झाले असून सोशल मीडियावर त्याला चांगलेच पसंत केले जात आहे.