शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल


मुंबई – पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे वादात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्याविरोधात कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता केतकी चितळेने पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता केतकी चितळेवर आक्षेपार्ह भाषेत असलेल्या या पोस्टवरून टीका होऊ लागली आहे. या कवितेमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. याप्रकारानंतर तिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्यासह कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.