आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातील ‘मैं की करां?’ हे मोस्ट अवेटेड गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे सोनू निगमने गायले आहे जो बऱ्याच दिवसांनी हिंदी चित्रपटाला आपला आवाज देत आहे.
Video : आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातील ‘मैं की करां?’ गाणे रिलीज
या गाण्यासोबत आमिर खान प्रॉडक्शनने शेअर केलेले पोस्टरही खूप हृदयस्पर्शी आहे. पोस्टरमध्ये एक मुलगी आणि एका मुलाचा मागून फोटो आहे. दोघेही एकमेकांचा हात धरुन आहेत, पण मुलाच्या पायात कॅलिपर आहे. (कॅलिपर हा एक बूट आहे जो पोलिओग्रस्त मुले त्यांना चालण्यास मदत करण्यासाठी घालतात). हे पोस्टर शेअर करत आमिर खान प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिले की, आमच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटातील मैं की करां या गाण्यासाठी सोनू, प्रीतम, अमिताभ यांचे आभार.
गाण्यात आमिर आणि करीनाच्या पात्रांची भेट आणि त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात समजते. या गाण्याचे बोल लिहिणारे अमिताभ भट्टाचार्य यांनी एका ओळीत जगातील अमर प्रेमकथेचा संदर्भ देत आमिर आणि करीनाच्या प्रेमकथेला ‘रोमियो हुआ था लट्टू जैसे ज्युलिएट पे’!, असे म्हटले आहे.
11 ऑगस्ट रोजी आमिरचा लाल सिंह चड्ढा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओने केली आहे. मिस्टर परफेक्शनिस्टसोबत या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत.