बीजिंग – चीनमधील चोंगकिंग येथे गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. तेथे तिबेट एअरलाइन्सच्या विमानाने विमानतळावर टेकऑफ दरम्यान धावपट्टी सोडली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान चोंगकिंगहून तिबेटमधील ल्हासाला जाणार होते. पण, धावपट्टी सोडल्यानंतर विमान थांबले, तोपर्यंत त्यात आग लागली होती. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
चीनमध्ये अपघात: टेकऑफ दरम्यान तिबेट एअरलाइन्सच्या विमानाने सोडली धावपट्टी, लागली आग, अनेक प्रवासी जखमी
Tibet Airlines TV9833/A319/B-6425 from Chongqing to Nyingchi was on fire during take-off this morning, details still not known. CKG/ZUCK closed for now. pic.twitter.com/CPL47fmfVk
— FATIII Aviation (@FATIIIAviation) May 12, 2022
चीनचे अधिकृत वृत्तपत्र पीपल्स डेलीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 113 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमान आगीत जळताना दिसत आहे. मात्र, या घटनेच्या इतर काही फोटोंमध्ये अग्निशमन दलाचे जवानही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवताना दिसत आहेत.
काय होते अपघाताचे कारण ?
प्राथमिक माहितीनुसार, उड्डाण करण्यापूर्वीच विमानातील कर्मचाऱ्यांना विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय होता. यानंतर घाईघाईने टेकऑफ थांबवण्यात आले. यादरम्यान विमानाने टेक ऑफ न करता धावपट्टी ओलांडली आणि आग लागली.