मुलीच्या ‘त्या’ फोटोवरून ट्रोल झाला आमिर खान


बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची लेक आयरा ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक असून सोशल मीडियावर आयरा ही सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच आयराने तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. आयरा यावेळी बिकिनीमध्ये केक कापत होती. नेटकऱ्यांनी हे पाहिल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे.


8 मे रोजी आयराने तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला आहे. आयराचा केकवर असलेली मेनबत्ती विझवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल झालेला फोटो इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आयरासोबत या फोटोत आमिर दिसत असून त्याचा मुलगा आझाद देखील दिसत आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त आमिरने पूल पार्टीचे आयोजन केल्याचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. पण यावेळी आयराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

आमिर पूल पार्टीत शर्टलेस असल्याचे दिसत आहे. तर आयराचा बिकीनी लुक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला नसल्याचे दिसत आहे. एक नेटकरी म्हणाला, हा वाढदिवस आहे की पूल पार्टी. त्याचवेळी दुसरा नेटकरी म्हणाला, लाज बाळग आमिर खान. तर तिसरा नेटकरी म्हणाला, हे बाप आणि लेक आहेत. काय ड्रेसअप झाले आहेत. थोडीपण लाज नाही. आणखी एक नेटकरी म्हणाला, मुलगी किती बेशरम आहे आणि त्याहून जास्त बेशरम बाप आहे.