ज्या दिवशी आपलं सरकार येईल त्या दिवशी मशिदींवरुन खाली येतील लाऊडस्पीकर… राज ठाकरेंनी शेअर केले बाळसाहेब ठाकरेंचे जुने भाषण


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला अल्टिमेटम आज संपला आहे. मनसेच्या अल्टिमेटमचा परिणामही राज्यभर दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार अजान देण्यात आली. अनेक ठिकाणी लाऊडस्पीकरशिवाय अजान करण्यात आली.

तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचाही प्रयत्न केला. पण, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे स्वत: आज शहरातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत ​​आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांचे काका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे भाषण करत आहेत की ज्या दिवशी महाराष्ट्रात आमचे सरकार येईल, त्या दिवसापासून मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर काढून टाकले जातील.


लाऊड स्पीकरबाबत काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे ?
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकर होणाऱ्या रस्त्यावरील नमाज आणि अजानला उघड विरोध केला होता. त्यांनी आपल्या एका भाषणात असेही सांगितले. आज त्याच भाषणाच्या व्हिडीओला शस्त्र बनवत राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, या महाराष्ट्रात ज्या दिवशी आमचे सरकार येईल. त्या दिवशी आम्ही रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण धर्म असा असावा की तो राष्ट्राच्या विकासाच्या आड येऊ नये. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये. आमच्या हिंदू धर्मात अशी समस्या कोणाला भेडसावत असेल, तर आम्हाला सांगा. मी त्याची व्यवस्था करीन. पण हे लाऊडस्पीकर मशिदीतून नक्कीच खाली येतील.

शिवसेना सोडलेल्या राज ठाकरेंनी आज त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांचे वर्ष जुने भाषण सोशल मीडियावर का शेअर केले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याची शिवसेना आपल्या खऱ्या मुद्दयांपासून भरकटली आहे, हे त्यांना या भाषणातून जनतेला सांगायचे आहे का? जी शिवसेना हिंदूंच्या उत्थानासाठी स्थापन झाली होती. तेच मुद्दे सोडून आज ती सेक्युलर झाली आहे. राज ठाकरे हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत, विशेषत: आघाडीचे निमंत्रक आणि राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार त्यांच्या पहिल्या निशाण्यावर आहेत.