चीनच्या महिला राजदूतासोबत पबमध्ये होते का राहुल गांधी ? भाजप नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न


नवी दिल्ली – नेपाळच्या वैयक्तिक दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधींचा एक व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. त्याच्यासोबत एक महिलाही दिसत आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्स आणि भाजपच्या काही नेत्यांनी दावा केला आहे की ही महिला चिनी राजदूत हौ यान्की आहे. भाजप नेत्यांचे असे अनेक ट्विट व्हायरल झाले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी नेपाळमध्ये पोहोचले. रिपोर्ट्सनुसार, ते त्यांच्या एका नेपाळी मैत्रिणी सुमनिमा उदासच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तिथे गेले होते. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये राहुल ज्या ठिकाणी दिसत आहे ते काठमांडूमधील लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स नाईट क्लब असल्याचे सांगितले जात आहे.


व्हिडिओमध्ये राहुलसोबत एक महिलाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. नाईट क्लबमध्ये गाणे जोरात वाजत असून तेथे लोकांची गर्दीही पाहायला मिळते. सोशल मीडियावर या व्हिडिओवर विविध प्रकारचे दावे केले जात आहेत.

असा दावाही केला जात आहे की, राहुल गांधींसोबत दिसणारी महिला ही चिनी राजदूत हौ यानकी आहे, जी 2018 पासून नेपाळमध्ये चीनचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.


पण काही सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की ही महिला हौ यांकी नाही, फक्त तिचा चेहरा राहुल गांधींसोबत दिसलेल्या महिलेसारखा आहे. कदाचित त्यामुळेच लोकांना ती चिनी राजदूत वाटली असेल. याबाबत ट्विटरवर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


राहुल गांधींसोबत पबमध्ये उपस्थित असलेली महिला.

व्हायरल व्हिडिओवर काँग्रेस प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण
राहुल गांधींच्या नाईट क्लबचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला. भाजप काँग्रेसवर निशाणा साधत असताना काँग्रेसने या व्हिडिओमध्ये काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राहुल गांधी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले आहेत आणि ही त्यांची निव्वळ वैयक्तिक भेट आहे. सुरजेवाला म्हणाले की, लग्न आणि लग्न समारंभाला उपस्थित राहणे ही आपली संस्कृती आणि सभ्यतेची बाब आहे.