लाल सिंग चड्ढाचे पहिले गाणे रिलीज


बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. कहाणी असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे व्हिज्युअलशिवाय रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये फक्त गाण्याचे शब्द दिसत आहेत. कहानी हे गाणे T-Series म्युझिक कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज केले आहे. यासोबतच आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसनेही कहाणी गाणे रिलीज झाल्याची माहिती दिली आहे.

हे गाणे पहिल्यांदा रेडिओ स्टेशनवर रिलीज झाले, असले तरी कहानी गाण्याला प्रीतमने संगीत दिले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणे लिहिले आहे. तर आवाज मोहन खन्ना यांनी दिला आहे. कहानी गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करणारे आहेत. कोणत्याही व्हिज्युअलशिवाय गाणे रिलीज करताना आमिर खान म्हणाला की, हे गाणे त्याला आणि करीनाला पाहण्यापेक्षा अधिक ऐकण्यास पात्र आहे.


रेडिओ 93.5 एफएमवर त्यांचे कहानी गाणे रिलीज करताना, आमिर म्हणाला, माझा खरोखर विश्वास आहे की लाल सिंग चड्ढाची गाणी चित्रपटाचा आत्मा आहेत आणि या अल्बममध्ये माझ्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम गाणी आहेत. प्रीतम, अमिताभ, गायक आणि तंत्रज्ञ यांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा हा एक अतिशय हेतुपुरस्सर निर्णय होता, कारण ते केवळ या व्यासपीठाच्या पात्रतेचेच नाहीत, तर संगीत देखील त्याच्या योग्य श्रेयस पात्र आहे.

आमिर खान पुढे म्हणाला, ज्या संगीतात टीमने आपले मन आणि आत्मा ओतला आहे, त्या संगीताला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही. कहानी, लाल सिंह चड्ढा चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आमिर खानच्या चाहत्यांना हे गाणे खूप आवडत आहे. यासोबतच ते कमेंट करून चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त करत आहेत.

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट हॉलिवूडच्या ऑस्कर विजेत्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाद्वारे आमिर तब्बल अडीच वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. आमिर खान शेवटचा ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. शराज बॅनरच्या या चित्रपटात आमिरने पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. यात कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत होत्या.