बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात कार्तिकच्या समोर अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. कार्तिक आणि कियारा यांचा हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमादरम्यान, कियारा आणि कार्तिकला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ‘भूल भुलैया 2’ च्या दरम्यान आता कार्तिक आर्यनचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. जे आजचे नाही तर 2019 चे ट्विट आहे आणि ते पीएम मोदींशी संबंधित आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण…
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या भूल भुलैया 2 मध्ये मंजुलिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवायला येत आहे. ट्रेलरमध्ये कार्तिकचा एक डायलॉग आहे, ‘तुम मंजुलिका कैसे हो सकती हो? डोनाल्ड ट्रंप के ट्वीट और चुड़ैलों के फीट हमेशा उल्टे ही होते हैं?’ ट्रेलरच्या या डायलॉगवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कार्तिकला या संवादाबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने तितक्याच हुशारीने उत्तर दिले. वास्तविक, कार्तिकने त्याच्या अनेक ट्विटमध्ये पीएम मोदींना टॅग केले आहे. त्याचवेळी त्यांच्या काही ट्विटवर पीएम मोदींची प्रतिक्रियाही आली आहे. अशा परिस्थितीत 2019 मध्ये कार्तिकने पंतप्रधानांची भेट घेतली. त्याच्यासोबत करण जोहर, इम्तियाज अली आणि दिनेश विजान होते. त्यानंतर पंतप्रधानांनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिली होती. त्याच वेळचे ट्विट सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
दुसरीकडे, कियारा अडवाणीच्या ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या विरुद्ध अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय राजपाल यादव, संजय मिश्रा आणि तब्बू देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 20 मे 2022 ला रिलीज होणार आहे.