अमेरिकेत ५ ते ११ वयोगटाला दिला जाणार करोना बुस्टर डोस

अमेरिकेची बडी फार्मा कंपनी फायझर ने अमेरिकेतील ५ ते ११ वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस दिला जावा अशी वकिली गुरुवारी केली आहे. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पूर्वीच १२ वर्षे वयावरील सर्वाना नव्या करोना व्हेरीयंट विरुद्ध सर्वोत्तम सुरक्षा मिळावी म्हणून बुस्टर डोसचा आग्रह धरला आहे. शिवाय ५० वर्षांवरील सर्वाना बुस्टरचा दुसरा डोस म्हणजे लसीचा चौथा डोस घेण्याचा पर्याय दिला आहे.

फायझरच्या म्हणण्यानुसार नवीन आकडेवारी पाहता ५ ते ११ वर्षातील मुलांना आणखी एक डोस देणे गरजेचे आहे. दोन डोस दिल्या गेलेल्या १४० मुलांना सहा महिन्यानंतर बुस्टर डोस दिल्यावर त्यांच्यातील प्रतिपिंडे वाढल्याचे दिसून आले होते असे कंपनीचे म्हणजे आहे. मात्र विशेष तज्ञांनी प्रकाशित केले गेलेल्या आकड्यांच्या सत्यतेबद्दल खात्री व्यक्त केलेली नाही. फायझरने या थंडीत ओमिक्रोनचा प्रकोप वाढल्यावर मुलांना बुस्टर डोस देऊन त्यांचे परीक्षण केले होते.

सध्या अमेरिकेत कोविडची तीव्रता कमी झाली आहे. ओमिक्रोनचे बीए.२ स्थानिक स्थरावर प्रभावी दिसत आहेत आणि आगामी काळात अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन ५ ते ११ वयोगटातील मुलांच्या बुस्टर साठी अनुमती देईल असे सांगितले जात आहे.