नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची जीभ लोकसभेतील चर्चेदरम्यान घसरली आणि त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्यात नसल्याचे म्हटले. जेव्हा सुप्रिया सुळे काय बोलल्या हे रिजिजू यांना लक्षात आले, तेव्हा त्यांनी मजेशीर उत्तर देत आपण अजूनही जिवंत असल्याचे सांगितले. पण, सुप्रिया सुळे यांनी तोपर्यंत आपली चूक सुधारत माफी मागितली होती.
सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य सुधारत मागितली माफी
लोकसभेतील एका चर्चेत सुप्रिया सुळे किरेन रिजिजूंचे कौतुक करत होत्या, पण ही स्तुती तेव्हाची होती, जेव्हा रिजिजू क्रीडा राज्यमंत्री होते. सुप्रिया सुळे यांनी हेच सांगताना चूक केली आणि रिजिजू आता मंत्रालयात नाहीत, असे म्हणण्याऐवजी केंद्रीय मंत्री राहिले नसल्याचे म्हटले. त्यानंतरही त्यांचे बोलणे सुरू होते, परंतु त्यांना त्यांची चूक लक्षात आली नाही.
I am very much alive and performing my duty @supriya_sule Ji..
Lighter note apart, thank you for the pleasant words because the spirit of sports transcend beyond politics and ideology to make one #TeamIndia pic.twitter.com/UsCRf1VBV0— Kiren Rijiju (@KirenRijiju) April 4, 2022
सुप्रियांचे लक्ष सभागृहात उपस्थित इतर सदस्यांनी याकडे वेधले असता, त्यांनाही धक्का बसला. त्यांच्या या वक्तव्याची सर्वप्रथम काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दखल घेतली. रिजिजू आता क्रीडामंत्री राहिलेले नाहीत, असे सांगत काँग्रेस नेत्याने सुळे यांचे विधान दुरुस्त केल्यानंतर सुळे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती सुधारून माफी मागितली.
जेव्हा याची माहिती रिजिजूंना मिळाली, तेव्हा त्यांनी ट्विट केले आणि ते म्हणाले की, सुप्रियाजी मी अजूनही जिवंत आहे आणि आपले कर्तव्य बजावत आहे. दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकाबद्दल रिजिजू यांनी आभार मानले. अरुणाचल प्रदेशमधून तीन वेळा खासदार असलेले रिजिजू हे यापूर्वी क्रीडा राज्यमंत्री होते, परंतु २०२१ च्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना कायदा मंत्री करण्यात आले. सध्या ते कायदा मंत्री म्हणून काम पाहत आहेत.