मुंबई मेट्रो उद्घाटनानंतर दोनच दिवसांत पडली बंद


मुंबई – सात वर्षानंतर मुंबईतील दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरिता सुरू झाले होते. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. पण तांत्रिक कारणांमुळे हीच मेट्रो दोनच दिवसांत बंद पडली. याबद्दल मुंबई मेट्रोने ट्वीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

तांत्रिक कारणामुळे मुंबई मेट्रोच्या मागाठणे ते आरे या मार्गावरची मेट्रो बंद पडली आहे. याबद्दलची माहिती मुंबई मेट्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, तांत्रिक कारणांमुळे मागाठणेकडून आरेकडे जाणारी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी दुसऱ्या मेट्रोची सोय करण्यात आली आहे. असुविधेबद्दल क्षमस्व!

सात वर्षानंतर मुंबईतील दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले होते. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा हा सात वर्षांपूर्वी जुन २०१४ ला प्रवासी वाहतुकीकरिता सुरु झाला होता. त्यानंतर मुंबईत एकुण पाच मेट्रो मार्गांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू झाली होती. यापैकी ‘मेट्रो ७’ ( Metro 7 ) आणि ‘मेट्रो २ अ’च्या ( Metro 2 A ) सुमारे २० किलोमीटर मार्गावरची वाहतूक २ एप्रिलपासून सुरू झाली होती.