महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात पेट्रोलची सर्वोच्च दरवाढ


मुंबई – देशातील तेल कंपन्यांकडून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली जात आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत आज बाराव्यांदा वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देत सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. अशातच महाराष्ट्रासह मुंबईच्या सर्व शहरांमध्ये आजही इंधनाच्या किमती कडाडल्या आहेत. दरम्यान परभणीत इंधन दरात सर्वोच्च वाढ म्हणजेच परभणी पेट्रोल 120.36 रुपये, तर डिझेल 103.02 रुपये नोंदवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात देशाच्या सर्व राज्यांप्रमाणे आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. आज मुंबईत 43.43 पैशांच्या वाढीनंतर पेट्रोलचे दर 118.83 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 103.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर आज पुण्यात पेट्रोलचे दर 118.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 101.13 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर आज नागपूरमध्ये पेट्रोल 118.49 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 101.24 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. कोल्हापुरातही पेट्रोलचे दर 118.74 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 101.47 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

तुमच्या मोबाईलवर इंडियन ऑईलचे IndianOil ONE Mobile App डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

एसएमएसद्वारे देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळू शकतात. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत).