महाराष्ट्रात आज दिवसभरात 130 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी आटोक्यात येत असल्याचे चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजारांखाली आली आहे. सध्या राज्यात 937 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यात आज 130 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 102 बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आज राज्यात दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 553 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 94, 53 , 522 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात सध्या 937 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 290 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्या खालोखाल ठाण्यात 145 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.