जेम्स बॉंड ००७, डेनियल क्रेगला  करोनाचा विळखा

जेम्स बॉंड ००७ हा ब्रिटीश गुप्तहेर चित्रपट रसिकांचा चांगलाच लाडका आहे. बहुतेक सर्व चित्रपटात सुंदर तरुणीच्या विळख्यात दर्शन देणारा हा हेर सध्या करोनाच्या विळख्यात सापडला असल्याचे वृत्त आहे. जेम्स बॉंड साकारणारा लोकप्रिय अभिनेता डॅनियल क्रेग नुकताच .नो टाईम टू डाय’ मध्ये दिसला होता. शनिवारी त्याची करोना चाचणी सकारात्मक आली असे समजते.

द हॉलीवूड रिपोर्टरच्या बातमीनुसार मॅकबेथ ब्रॉडवे प्रोडक्शन मधील बऱ्याच सदस्यांना करोनाची लागण झाल्याने हा कार्यक्रम रद्द केला गेला. या कार्यक्रमात डेनियल क्रेग सहभागी होणार होता. पण त्यालाही करोना झाल्याचे चाचणीत दिसून आले. मॅकबेथ ऑन ब्रॉडवेच्या अधिकृत इन्स्टा पेजवर कंपनीने केलेल्या पोस्ट नुसार काही लोकांना  कोविड १९ संक्रमण झाल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केला गेला आहे. ज्यांनी या कार्यक्रमांची तिकिटे काढली होती त्यांना झालेल्या असुविधेबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे. यापूर्वी दुपारी आणि रात्रीचे कार्यक्रम २ एप्रिल रोजी रद्द झाल्याचे सुद्धा कंपनीने जाहीर केले होते.