चीनी करोना लस फेल गेल्यानेच लॉकडाऊनची वेळ

करोना अनेक देशात नियंत्रणात येत असताना चीन मध्ये मात्र करोना केसेस वेगाने वाढत चालल्या आहेत. ही लाट नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला फार प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामागे दोन मुख्य कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे बीजिंगची झिरो कोविड पॉलीसी अयशस्वी ठरली आणि चीनी करोना लस परिणामकारक नाही. चीनने सिनोवॅक व सिनोफार्म अश्या दोन लसी करोनाच्या सुरवातीच्या काळातच बाजारात आणल्या होत्या, विविध देशात निर्यात केल्या होत्या आणि काही देशाना दान म्हणून दिल्या होत्या.

तेव्हापासूनच या लसी परिणामकारक नाहीत अश्या तक्रारी विविध देशातून आल्या पण चीनने हे आरोप फेटाळले होते. रिपोर्ट नुसार अनेक देशांनी या लसीचे बुस्टर डोस सुद्धा नागरिकांना दिले. पण डिसेंबर मध्ये ओमिक्रोन जेव्हा वेगाने फैलावू लागला तेव्हा त्याला प्रतिकार करण्यास त्या लसी असफल ठरल्याचे दिसून आले.

हॉंगकॉंग विश्वविद्यालात केलेल्या अध्ययनात सिनोवॅक व सिनोफार्म ओमिक्रोन विरूद प्रतीपिंडे तयार करण्यास सक्षम नाहीत. पूर्वी ज्यांना या लसीचे दोन डोस दिले गेले त्यानाही त्यापासून सुरक्षा मिळाली नाही. २०२१ मध्ये १.६ अब्ज नागरिकांना २.६ अब्ज डोस दिले गेले पण सरकारी रिपोर्ट नुसार ८० वर्षांवरील ३ टक्के रुग्ण दोन्ही डोस घेतल्यावर सुद्धा करोना मुळे मृत्युमुखी पडले. १ डोस घेतलेल्या मध्ये मृत्युदर ६ टक्के दिसला. या डोस मुळे ल्युकेमिया होत असल्याचा तक्रारी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे करोना संक्रमण चेन तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन शिवाय अन्य पर्याय चीन सरकारपुढे राहिलेला नाही. मोठी शहरे, बाजार, पुरवठा बंद झाल्याचे दृश्य चीन मध्ये सध्या दिसते आहे.