गेल्या महिन्यात अमेरिकेत २ लाख ७० हजार मुलांना करोना संक्रमण

करोना पुन्हा एकदा काही देशात डोके वर काढू लागला असून अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची पाळी आली आहे.  करोना संदर्भातील सर्व निर्बंध उठविलेल्या अमेरिकेत अजूनही करोना नियंत्रणात आलेला नाही. गेल्या चार आठवड्यात अमेरिकेत २ लाख ७० हजार लहान मुले करोना संक्रमित झाली असल्याची माहिती अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पीडीअॅट्रिक्स व चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएनच्या रिपोर्ट मध्ये दिली गेली आहे.

सर्व जगाप्रमाणेच अमेरिकेत सुद्धा गेली दोन वर्षे करोनाचे अस्तित्व आहे आणि आता लहान मुलानांही करोना संक्रमण होण्याचा वेग वाढला आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात १.२८ कोटी मुलांना करोना लक्षणे दिसली आणि त्यातील १९ टक्के रिपोर्ट पॉझीटिव्ह आहेत. गेल्या महिन्यात हा आकडा २,७०००० लाखावर गेला आहे. अर्थात करोनाचे गांभीर्य आणि त्याचा संभावित दीर्घकालीन प्रभाव अभ्यासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा केला जात आहे.

दरम्यान चीन मध्येही ओमिक्रोनचा संसर्ग वेगाने पसरत चालला असून हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्यानंतर करोना वेगाने पसरत चालल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्यात चीन मध्ये या स्पर्धा पार पडल्या होत्या.