डीजीलॉकर डाऊनलोडने नोंदविले रेकॉर्ड

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरु झालेल्या डीजीलॉकरने डाऊनलोडचे मोठे रेकॉर्ड नोंदविले असून आत्तापर्यंत १० कोटी नागरिकांनी डीजीलॉकर अॅप डाऊनलोड केले आहे. या लॉकर मध्ये पॅन, आधार, वाहन चालक परवाना अशी अनेक प्रकारची जरुरी कागदपत्रे ठेवता येतात आणि आवश्यक तेव्हा व्हिज्युअली सादर करता येतात. अनेक कामे, योजनांचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे घरात सांभळून ठेवावी लागतात. पण डीजीलॉकर मुळे अशी सर्व कागदपत्रे आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दाखविता येण्याची सोय मिळते.

डीजीलॉकर वापरासाठी भारत सरकारने डीजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत क्लाऊड आधारित सेवा सुरु केली आहे. त्याचा लाभ कुणीही नागरिक घेऊ शकतो. यात स्टोअर केलेली महत्वाची सर्व कागदपत्रे व्हर्च्युअली व्हेरीफाय करता येतात. त्यामुळे डीजीलॉकरची लोकप्रियता वाढत चालल्याचे दिसून आले आहे. डीजीलॉकरसाठी अकौंट उघडताना प्रथम digilocker. gov.in या वेबसाईटवर जाऊन साईन अप पर्याय क्लिक करावा लागतो. नंतर तेथे मागितलेली माहिती सबमिट करावी लागते आणि पासवर्ड नोंदविला कि मोबाईलवर ओटीपी येतो. तो किंवा फिंगरप्रिंट पर्याय स्वीकारून प्रक्रिया पूर्ण होते. मग आपले युजर नेम आणि पासवर्ड वापरून आपण लॉग इन करू शकतो.

त्यासाठी डीजीलॉकर अॅप डाऊनलोड करावे लागते. अपलोड डॉक्युमेंट क्लिक केल्यावर स्थानिक ड्राईव्ह मध्ये फाईल शोधून ओपनवर क्लिक करावे लागते. येथे आपली सर्व कागदपत्रे एकाच वेळी सेव करता येतात.