देशात हे मशीन तयार करेल खास क्रिकेटर्स
क्रिकेटप्रेम हे भारताचे वैशिष्ट्य मानले जाते. या खेळात भारताची प्रगती उत्तम आहे आणि आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर एका पेक्षा एक खेळाडू भारताकडे आहेत. याचे कारण म्हणजे स्थानिक पातळीवर या खेळाडूना मिळत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा. आता त्यात आणखी वाढ होत असून खासगी कंपनी बीडीएम व स्वीप अँड रीफ्ट कंपनीने एक खास मशीन तयार केले आहे. यामुळे आगामी काळात देशाला आणखी वर्ल्ड क्लास क्रिकेटर्स मिळू शकणार आहेत. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन मेरठ स्टेडीयमवर केले गेले आहे.
जगातील हे पहिले ऑटो बॉलिंग मशीन असल्याचे सांगितले जात आहे. हे मशीन सामान्य नाही. फलंदाजांना त्यांना आवडणारे चेंडू ते टाकू शकते आणि ताशी १५५ किमीच्या वेगाने सुद्धा चेंडू फेकू शकते. फलंदाजांचे तंत्र त्यामुळे सुधारणार आहे. या मशीन मधून फास्ट, स्लो, इनस्विंग, स्पिन असे सर्व प्रकारे बोलिंग केली जाते. एखाद्या रोबो प्रमाणे हे मशीन काम करते. खेळाडू मशीनबरोबर लॅपटॉप, मोबाईल वरून वायफाय कनेक्ट होऊ शकतात. १ किमी रेंज मध्ये डिव्हाईस कनेक्ट होऊ शकते.
या मशीनला मान्यता मिळावी म्हणून बीडीएमचे प्रमुख राकेश महाजन बीसीसीआय बरोबर बोलणी करत असल्याचे समजते.