ऋषी कपूरच्या अखेरच्या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता दिवंगत ऋषी कपूर यांच्या अखेरच्या चित्रपटाचे, ‘शर्माजी नमकीन’ चे ट्रेलर रिलीज झाले आहे. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या सह परेश रावल आणि जुही चावला यांच्या भूमिका आहेत. ट्रेलर रिलीज होताच सोशल मिडियावर ऋषी कपूर आणि परेश रावल ट्रेंड होऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांचा २०२० मध्ये मृत्यू झाल्यावर जे भाग शूट करायचे राहिले होते त्याचे शुटींग परेश रावल यांनी पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कलाकार शर्माजी भूमिकेत दिसणार आहेत. ३१ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होत आहे. सेवानिवृत्त, मध्यमवर्गीय व्यक्ती नवीन छंदाच्या शोधात असते आणि तिला स्वयंपाकात खूपच रस असतो यावर चित्रपटाची कथा आहे. हितेश भाटीया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

दोन कसलेले कलाकार एकच भूमिका साकारणार म्हणून त्यांचे चाहते खुश आहेत. ऋषी कपूरचे हे शेवटचे दर्शन म्हणून दुःख आहे पण त्यात आनंद ही आहे अश्या अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.