युक्रेन युद्धामुळे पुतीन यांची गर्लफ्रेंड संकटात

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्याने पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड संकटात सापडली आहे. अलींना काबाइवा ही पुतीन यांची कथित गर्लफ्रेंड सध्या स्वित्झर्लंड मध्ये असल्याने सांगितले जात आहे. येथील जनतेच्या मनात पुतीन यांच्याबद्दल राग आहे. त्यामुळे अलींनाला देशात आश्रय देऊ नये आणि तिची स्वित्झर्लंड बाहेर रवानगी करावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या गेल्याचे समजते.

अलींना तीन मुलांची आई असून उत्तम जिमनास्ट आहे. तिने खेळात अनेक खिताब मिळविले आहेत. दोन वेळ ओलीम्पिक गोल्ड, १४ जागतिक जेतेपदे, २५ युरोपियन चँपियनशिप्स अशी तिची कारकीर्द आहे. पुतीन यांच्याबरोबर तिचे नाव जोडले गेले आणि तिचे आयुष्य बदलून गेले. तिला २०१८ मध्ये शेवटचे पाहिले गेले होते. त्यावेळी ती २ महिन्याची गरोदर होती. २०१९ मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिल्याची बातमी आली होती. त्यावेळी मास्को मध्ये तिच्यासाठी व्हीव्हीआयपी फ्लोर रिकामा केला गेला होता असेही सांगितले जाते.

युक्रेनवर हल्ला केल्यावर रशियावर जगभरातील देशांकडून चौफेर प्रतिबंध लावले गेले तेव्हा पुतीन यांनी त्यांचा परिवार स्वित्झर्लंड मध्ये पाठविला अशी चर्चा आहे. अलींना संदर्भात मिडियाकडे अचूक माहिती नाही. खेळातून निवृत्ती घेतल्यावर अलींना राजकारणात आली होती. पुतीन यांच्या युनायटेड रशिया पक्षाची ती खासदार होती.