अमेरिकेचे माजी अध्यक्ष ओबामा करोना पॉझीटिव्ह

सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषविलेले, पहिले कृष्णवर्णी, म्हणून अमेरिकेच्या इतिहासात नोंद झालेले बराक ओबामा यांना करोना झाला आहे. या संदर्भात ओबामा यांची ट्वीट करून माहिती दिली आहे. ओबामा म्हणतात, ‘गेले काही दिवस घसा खवखवत होता. त्यामुळे करोना टेस्ट केली ती पॉझीटिव्ह आली आहे. लक्षणे सौम्य आहेत, माझी तब्येत बरी आहे.’

याच ट्वीट मध्ये ओबामा पुढे लिहितात,’ आम्ही योग्य निर्णय घेतला होता. मी आणि मिशेलने दोघांनी करोना लस घेतली होती. मिशेलचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. ज्या नागरिकांनी अजून लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी हे रीमाइंडर आहे. करोना केसेस भलेही कमी झाल्या असल्या तर करोना अजून संपलेला नाही.’

अमेरिकेच्या सेंटर फोर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने मार्च च्या मध्यापर्यंत दररोज ३५००० नव्या केसेस नोंदविल्या जात असल्याचे जाहीर केले आहे. अर्थात जानेवारी मध्ये दररोज सरासरी ८ लाख १० हजार नवीन केसेस नोंदविल्या जात होत्या त्यामानाने हे प्रमाण वेगाने कमी होताना दिसले आहे. अमेरिकेत पाच वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील नागरींकांपैकी किमान ८० टक्के लोकांना करोना लसीचा किमान एक डोस मिळालेला आहे.