Video : थेट सिंहासमोर जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागला हा व्यक्ती

दिल्लीच्या एका प्राणी संग्रहालयात एक हैराण करणारी घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती थेट सिंहाच्या कुंपणातच उडी मारून त्याच्या समोर जाऊन बसला. यावेळी सिंह त्याच्या अंगावर देखील आला मात्र त्या व्यक्तीला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

या व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नसून, निजामुद्दीन पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीचे मानसिक आरोग्य व्यवस्थित नाही. या 28 वर्षीय व्यक्तीचे नाव रेहान खान असून, तो बिहारचा आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हे वेडेपणाचे कृत्य असल्याचे म्हटले तर काहींनी या व्यक्तीच्या हिंमतीला दाद दिली.

काही दिवसांपुर्वी अमेरिकेतील महिलेचा देखील अशाच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. महिलेने सिंहासमोर उड्या मारत त्याला चिढवण्याचा प्रयत्न करत होती. या व्हिडीओनंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.

Leave a Comment