पिझ्झा खा आणि वजन घटवा


वाढते वजन ही आज अनेकांची समस्या आहे. विविध डाएट प्लान, जिम व्यायाम, अन्य उपचार, उपासमार करूनही वजनाचा काटा हलायला तयार नाही याचा अनुभवही बरेचजण घेत आहेत. वजन कमी करणाऱ्यांना पिझ्झा सारखे पदार्थ म्हणजे विषासमान अशीही एक समजूत आहे. मात्र अमेरिकेतील एका शेफने फक्त पिझ्झा खाऊन ३६ किलो वजन घटविले आहे. त्यामुळे तो लोकांना पिझा खाऊन घटवा वजन असा सल्ला देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार न्युयॉर्क मधील एका शेफने रोज पिझ्झा खाऊन त्याचे वजन ३६ किलो कमी केले. यासाठी त्याने कोणताही जास्तीचा वर्कआउट केला नाही. तरीही वजन कमी होण्यामागचे गुपित त्याने शेअर केले आहे. तो म्हणतो मी लंचला रोज पिझ्झा खाल्ला फक्त त्याचा बेस बाजारातून तयार आणला नाही तर आटा, पाणी, मीठ व यिस्ट वापरून तो स्वतः तयार केला. न्युट्रिशन पूर्ण मिळाले पाहिजे हे लक्षात ठेऊन टॉपिंग मध्ये भाज्या, मश्रुम, आवडते मीट वापरले आणि चीज अगदी प्रमाणात घातले. लंच मध्ये पिझा खाताना अन्य कोणतेही फास्ट फूड खाल्ले नाही तसेच कोल्डड्रिंक ऐवजी फळाचे ज्यूस घेतले. त्याने रोजचा त्याचा व्यायाम नियमाने केला तेव्हा वजन कमी होत असल्याचे त्याला दिसून आले.

Leave a Comment