महाराणी एलिझाबेथ करोनाच्या विळख्यात?

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बुधवारी त्यांना चालता येत नसल्याची तक्रार केल्यानंतर महाराणीना करोना संक्रमण तर झाले नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी महाराणी एका मिटिंग मध्ये सामील झाल्या होत्या पण त्यानंतर शेअर झालेल्या व्हिडीओ मध्ये ९५ वर्षीय महाराणी दोन नेव्हल अधिकार्यांचा आधार घेऊन चालताना दिसल्या. बैठकीत खुर्चीवरून उठल्यावर महाराणी काठी घेऊन उभ्या राहिल्या पण त्यानी चालता येत नसल्याची तक्रार केली.

ही बैठक विंडसर कॅसल रेसिडेंस मध्ये आयोजित केली गेली होती. महाराणी एलिझाबेथ यांची करोना टेस्ट केली गेली वा नाही याचा खुलासा केला गेलेला नाहीच पण बकिंघम पॅलेस कडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिला करोना संक्रमित झाले आहेत आणि हे दोघेही सोमवार पासून विलगीकरणात आहेत. ७३ वर्षीय चार्ल्स आणि ७४ वर्षीय कॅमिला या दोघांनीही करोना लसीचे तीन डोस घेतले आहेत. करोना टेस्ट पॉझीटीव्ह येण्यापूर्वी प्रिन्स चार्ल्स लंडनच्या ब्रिटीश म्युझियम मधील एका मोठ्या कार्यक्रमात सामील झाले होते आणि अनेकांना तेथे भेटले होते. त्यात चान्सलर ऋषी सुनक व आरोग्यमंत्री साजिद जावेद यांचा समावेश आहे.

प्रिन्स चार्ल्स यांनी महाराणींची भेट घेतली होती असे सांगितले जात आहे. त्यामुळे कदाचित महाराणीना संसर्ग झाला असावा का अशी शंका व्यक्त केली जात आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा प्रिन्स चार्ल्स यांना करोना झाला होता.