Video : सिंहासमोर उभे राहून महिलेने दाखवल्या वाकुल्या, पुढे काय झाले ते बघाच

सिंह आपल्या समोर आला तर आपले काय होईल ? भितीने आपला तेथेच थरकाप उडेल. पळून जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण जाऊ शकत नाही. मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जे घडले ते हैराण करणारे होते. सिंहासमोर जाऊन अमेरिकेतील एका महिलेने असे कृत्य केले की, ते बघून सर्वच जण हैराण झाले आहेत व यामुळे तिच्यावर टीका देखील केली जात आहे.

न्युयॉर्कच्या ब्रॉन्स प्राणी संग्रहालयात एक महिलेने मस्ती करत असताना अचानकच सिंहाच्या कुंपणातच उडी मारली आणि त्याला चिढवू लागली. ती महिला सिंहासमोर उभी राहून अजिबात न घाबरता त्याला वेड्यावाकड्या वाकुल्या दाखवत होती. मात्र सुदैव म्हणजे सिंह केवळ त्या महिलेच्या कृत्याकडे बघतच राहिला, त्याने त्या महिलेला काहीही केले नाही.

महिलेच्या या करामतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रिअल सोबरीनो नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स महिलेच्या या कृत्याला वेडेपणाचे लक्षण म्हणत आहेत.

या ब्रॉन्स प्राणी संग्रहालयाने म्हटले आहे की, महिलेने प्राणी संग्रहालयाच्या नियमांचे पालन केले नाही. या कृत्यामुळे तिचे प्राण ही गेले असते.

 

Leave a Comment