सांधेदुखीसाठी आजमावा कोबीची पाने

c2
कोबी आरोग्यासाठी अतिशय लाभकारी असून, यामध्ये क्षार, जीवनसत्वे, आणि अँटी ऑक्सिडंटस् मुबलक मात्रेमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये क जीवनसत्व, पोटॅशियम, आणि लोहही आहे. म्हणूनच युरोपियन घरगुती औषधांमध्ये याचा वापर आढळतो. कोबीच्या सेवनाने रक्तशुद्धी होत असून, लिव्हरमधून घातक, विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासही कोबीचे सेवन सहायक आहे. कोबीच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे होतातच, पण त्याशिवाय कोबीची पाने त्वचेवर लावल्यास त्वचा रोगांमध्ये ही याचा फायदा दिसून आला आहे. लहान जखमा, एक्झिमा, सोरायसिस यांसारख्या समस्यांवर कोबीची पाने गुणकारी मानली गेली आहेत. आपल्याकडे सर्वसामान्यपणे उपलब्ध असणाऱ्या हिरव्या कोबीच्या बरोबरच ‘रेड कॅबेज’, तसेच कोबीचे इतर प्रकारही आरोग्यासाठी चांगले आहेत.
c3
युरोपमध्ये कोबीची पाने मुख्यतः सांधेदुखी साठी वापरली जात असत. हा उपाय घरगुती असला, तरी अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जात असे. यासाठी आजकाल आपल्याकडे सहज उपलब्ध असणाऱ्या लाल रंगाच्या कोबीची पाने वापरली जातात. या कोबीची पाने काढून घेऊन स्वच्छ धुवावीत. ही पाने पुसून पूर्ण कोरडी करावीत आणि या पानांवर हलक्या हाताने लाटणे फिरवून याचा रस निघू द्यावा. त्यानंतर ही पाने अल्युमिनियम फॉईल मध्ये गुंडाळावीत आणि ओव्हनमध्ये किंवा तव्यावर गरम करावीत.
c4
आपल्या त्वचेला सहन होईल इतपत ही पाने गरम झाल्यानंतर अल्युमिनियम फॉईल मधून ही पाने काढून घ्यावीत आणि दुखऱ्या सांध्यांवर बांधावीत. ही पाने जागची हलू नयेत या करिता या पानांवर बँडेज बांधावे. कोबीची पाने दुखऱ्या सांध्यावर साधारण एक तास बांधून ठेवावीत. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करावा. जर पाने गरम करून लावायची नसून, थंड करून लावायची असतील, तर ही पाने दुखऱ्या सांध्यावर लावण्यापूर्वी तासभर आधी फ्रीझरमध्ये ठेवावीत आणि त्यानंतर दुखऱ्या सांध्यावर बांधावीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment