फळे आणि भाज्या अशा प्रकारे धुणे आरोग्यास हितकारक

fruits1
फळे आणि भाज्या खाल्ल्या जाण्यापूर्वी स्वच्छ धुतली जाणे आवश्यक आहे. पण आजकाल फळे पिकविण्यासाठी आणि भाज्या टिकविण्यासाठी अनेक तऱ्हेची रसायने वापरण्यात येत असतात. ही रसायने किंवा तत्सम कृत्रिम पदार्थ केवळ पाण्याने धुतल्यावर नष्ट होतीलच असे नाही. त्यामुळे भाज्या आणि फळांचे सेवन करण्यापूर्वी ते व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. म्हणूनच विशिष्ट प्रकारे भाज्या किंवा फळे धुतली गेल्यानंतर हे खाण्यासाठी संपूर्ण सुरक्षित होऊ शकत असल्याचे निदान शास्त्रज्ञांनी केले आहे.
fruits2
मॅसेच्यूसेट्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी फळे आणि भाज्या खाण्यासाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केला असता, भाज्या आणि फळे बहुत करून केवळ पाण्याने धुतली जात असल्याचे निदर्शनाला आले. काही लोक भाज्या आणि फळे धुताना क्लोरीनचा वापर करीत असल्याचे निदर्शनाला आले, तर काही लोक भाज्या आणि फळे धुण्यासाठी पाण्यामध्ये खाण्याचा सोडा घालून त्यामध्ये भाज्या आणि फळे धुवत असल्याचे स्पष्ट झाले.
fruits
शास्त्रज्ञांच्या मते पाण्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळलेल्या मिश्रणामध्ये फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी धुतल्याने त्यावरील सर्व रसायने, कीटकनाशके साफ होत असून, या मिश्रणामध्ये धुतलेल्या भाज्या आणि फळे खाण्यासाठी संपूर्णपणे सुरक्षित होतात. फळे आणि भाज्या या मिश्रणामध्ये धुण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा मिसळावा. उपयोगात आणावयाच्या असलेल्या भाज्या आणि फळे पंधरा मिनिटे या मिश्रणामध्ये बुडवून ठेवावीत. त्यानंतर ही फळे आणि भाज्या या मिश्रणातून काढून घेऊन स्वच्छ पाण्याखाली पुन्हा एकदा धुवावीत आणि त्यानंतर खाण्यास घ्यावीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment