जाणून घ्या दिवसातून अनेकदा हात उंचाविण्याचे फायदे

shoulder-exercises1
आपल्या शरीराच्या दोन्ही बाजूंना आपले हात खाली सोडलेले असतात. ही हातांची सामान्य स्थिती आहे. मात्र दिवसातून अनेकदा हात डोक्याच्या वर उंचाविल्याचेही अनेक फायदे आहेत. त्यामुळे दिवसातून अनेकदा थोड्या वेळाकरिता हात डोक्याच्या वर उंचवावेत. हात उंचाविण्याच्या स्थिती मुळे शरीराचे पचनतंत्र सुधारण्यास मदत होऊन अन्नपचन व्यवस्थित होते. अनेकदा जेवणानंतर पोट हलके फुगल्याची भावना होते. डोक्याच्यावर हात उंचाविल्याच्या स्थितीमुळे फुगलेले पोट पुन्हा पूर्वस्थितीला येण्यास मदत होते.
shoulder-exercises
दिवसातून अनेकदा थोड्या वेळाकरिता हात डोक्यावर उंचाविल्याने पाठीच्या कण्याला आवश्यक तितका ताण मिळतो आणि त्यामुळे ‘पोश्चर’, म्हणजेच मणक्याची स्थिती सुधारण्यास मदत होते. ज्यांना दिवसभर कॉम्प्यूटरवर काम करावे लागते, किंवा सतत झुकून काम करावे लागते, त्यांच्यासाठी हा व्यायाम विशेष फायदेशीर आहे. यामुळे पाठीचा मणका अधिक लवचिक होण्यास मदत होते.
shoulder-exercises2
जसेजसे आपले वय वाढत जाते, तसतशी आपल्या शरीरातील अवयवांची जागा थोडीफार सरकते. डोक्यावर हात उंचाविल्याने हे अवयव पूर्वस्थितीला येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या व्यायामामुळे पाठ, हात, खांदे, आणि पोटाच्या स्नायूंना पुरेसा ताण मिळतो. ज्यांच्या शरीरामध्ये वॉटर रीटेन्शनची समस्या आहे, त्यांनी दर वेळी पाणी प्यायल्यानंतर दोन्ही हात काही वेळाकरिता उंचवावेत. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी शरीरामध्ये साठून न राहता ते शरीराच्या बाहेर टाकले जाते, व या पाण्यासोबत शरीरातील घातक, विषारी पदार्थही बाहेर टाकले जातात.
shoulder-exercises3
ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास असेल, त्या व्यक्तींनीही हा व्यायाम नियमित करावा. त्याबरोबरच प्रत्येक भोजनाच्या वीस ते तीस मिनिटे आधी एक ग्लास कोमट पाण्याचे सेवन करावे. हा व्यायाम दिवसातून अनेक वेळा करणे श्रेयस्कर आहे. हा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे राहावे. दोन्ही हात डोक्याच्या वर उंच करावेत, हात ताठ ठेवून दोन्ही हातांचे तळवे नमस्कार केल्याप्रमाणे जुळवावेत. हात डोक्याच्या वर उंचाविताना संपूर्ण शरीराला हलका ताण द्यावा. हे स्थिती एक मिनिटभर ठेवावी. हा व्यायाम सलग तीन वेळा, एक-एक मिनिटा करिता करावा, तसेच दिवसातून अनेक वेळा हा व्यायाम करणे श्रेयस्कर आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment