फ्रांस मध्ये करोनाचे नवे व्हेरीयंट सापडले

करोनाच्या ओमिक्रोनचा फैलाव युरोपीय देशात अतिशय वेगाने होत असतानाच फ्रांस मध्ये करोनाचे आणखी एक नवे व्हेरीयंट सापडले असून त्याचे नाव बी.१.६४०.२ असे केले गेले आहे. या व्हेरीयंटचा संसर्ग झालेले १२ लोक सापडले आहेत. हे व्हेरीयंट ४६ वेळा म्युटेट झाल्याचेही सांगितले जात आहे. या व्हेरीयंट चे संक्रमण किती वेगाने होईल किंवा ते किती धोकादायक ठरेल यावर संशोधन सुरु असून त्याचे निष्कर्ष येण्यास काही वेळ द्यावा लागणार आहे असेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांच्यात हे संक्रमण आढळले ते कॅमेरून येथून परतले होते. त्यामुळे हे व्हेरीयंट द. आफ्रिकेत फैलावू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. करोनाची नवनवी व्हेरीयंट सतत समोर येत आहेत. गतवर्षी सुद्धा अशी अनेक व्हेरीयंट आली असून त्यावर अजूनही संधोधन आणि अध्ययन सुरु आहे. कोणतेही नवे व्हेरीयंट दोन पातळीवर धोकादायक असू शकते. एक त्याचा संक्रमणांचा वेग आणि दुसरे मृत्युदर. फ्रांस मध्ये मिळालेल्या या व्हेरीयंट बाबत अजून ही स्पष्टता नाही. ४६ वेळा बदल झालेला हा विषाणू लसीला मात देऊ शकेल अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

वैज्ञानिकांच्या मते नवीन व्हेरीयंट स्वतः मध्येच करोना लसीची प्रतिरक्षा तयार करत आहेत.