देशात करोना लसीकरणाचे नवे रेकॉर्ड, राज्यात दोन नेते करोना बाधित

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात करोना लसीचे १४५ कोटी डोस दिले गेले असून ६० वर्षावरील ६९ टक्के तर ४५ ते ५९ वयोगटात ७३ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. १८ ते ४४ वयोगटात ५५ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. लसीकरणाबाबत देशाने नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. २०२१ च्या अखेरी जेष्ठ नागरिकांपैकी ९० टक्क्यापेक्षा जास्त जनतेने लसीचा पहिला डोस घेतला आहे तर शुक्रवारी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ६४ टक्के आहे.

संपूर्ण लसीकरण झालेले हिमाचल हे देशातील पहिले राज्य बनले आहे तर पंजाब मध्ये ४० टक्के लसीकरण झाले आहे. महाराष्टात ८०६७ नवीन संक्रमित सापडले आहेत. पैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १७६६ पूर्ण बरे झाले आहेत. मुंबईत संक्रमितांची संख्या सर्वाधिक असून ओमिक्रोनचे चार नवे संक्रमित आढळले आहेत.

महाराष्ट्राच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना करोनाची बाधा झाल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे तर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यानाही करोना झाला असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली करोना मधून बरे झाले असून त्यांना घरी पाठविले गेले आहे. मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत तपासणीसाठी पाठविल्या गेलेल्या सँपल मध्ये ५५ टक्के ओमिक्रोन पॉझीटिव्ह आहेत. मात्र त्यातील फारच कमी संक्रमिताना हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले आहे.