मंगळवारी करोना त्सुनामी, जगात नव्या १२.२२ लाख केसेस

फोटो साभार नागपूर टूडे

करोना बरोबरच करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोन वेगाने फैलावत असून मंगळवारी जगभरात करोनाच्या १२.२० लाख नव्या केसेस नोंदल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर ओमिक्रोन आता १२० देशात पोहोचला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. मंगळवारी जगभरात करोनाने ६८९९ बळी घेतले आहेत. ब्रिटन मध्ये २४ तासात रेकॉर्ड १,२९,४७१ नव्या केसेस नोंदल्या गेल्या असून अमेरिकेत हीच संख्या ४,४१,२७८ वर गेली आहे. त्यामुळे ही करोनाची त्सुनामी मानली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार फक्त अमेरिकेन महाद्वीप क्षेत्रात करोना संक्रमितांच्या संख्येत ३४ टक्के वाढ होऊन १४.८ लाख नव्या केसेस नोंदल्या गेल्या असून फक्त अमेरिकेत ३४ टक्के वाढ झाली असून ११.८ लाख केसेस नोंदल्या गेल्या. त्यातील ४,४१,२७८ केसेस एका दिवसात म्हणजे मंगळवारी नोंदविल्या गेल्या आहेत. यापूर्वी २० डिसेंबर रोजी २.९० लाख केसेस नोंदल्या गेल्या होत्या.

रॉयटरच्या रिपोर्ट नुसार अमेरिकेत गेल्या आठवड्यात रोज सरासरी २,५८,३१२ केसेस नोंदल्या गेल्या आहेत तर युरोप मध्ये फ्रांस मध्ये सर्वाधिक केसेस आहेत. मंगळवारी फ्रांस मध्ये २ लाख नव्या केसेस आल्या असून मृतांची संख्या २९० आहे. जानेवारी मध्ये करोना संक्रमितांची संख्या दररोज अडीच लाखावर जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. लंडन मध्ये सर्वाधिक संक्रमित आहेत आणि तेथे १४३ मृत्यू झाले आहेत. येथे ओमिक्रोन संक्रमणाचा दर सर्वाधिक म्हणजे ५३ टक्के आहे.

दरम्यान सोमवारपासून द. आफ्रिकेत करोना संक्रमण दर ३८ टक्के घसरला आहे. करोना मृत्यू प्रमाणात दर १० ओमिक्रोन मृत्युपैकी ९ लस न घेतलेले आहेत. एकूण ३९० ओमिक्रोन मृत्युपैकी ४० मृत्यू लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे झाले आहेत असे जाहीर केले गेले आहे.