नितळ त्वचेसाठी आजमावा संपूर्ण नैसर्गिक उपचार

skin
आपली त्वचा सुंदर आणि नितळ असावी याकरिता अनेक सौंदर्य प्रसाधने आणि ब्युटी थेरपीज आपण आजमावत असतो. त्याच्या जोडीला अनेक घरगुती उपायही सुरु असतात. या उपायांचा सर्वात मोठा फायदा हा, की यामध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध असून, हे वापरण्यास संपूर्ण सुरक्षित असते. सुंदर आणि काचेप्रमाणे चमकदार आणि नितळ त्वचेला आजकालच्या प्रसाधनाच्या भाषेमध्ये ‘ग्लास स्किन’ म्हटले जाते. अश्या प्रकारच्या सुंदर आणि नितळ ‘ग्लास स्किन’ साठी संपूर्ण नैसर्गिक उपाय, घरच्याघरी आजमावून पाहता येतील.
skin1
आजकाल त्वचेशी निगडित समस्या मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतात. कोरडी, निस्तेज त्वचा, चेहऱ्यावर सतत येणारी मुरुमे-पुटकुळ्या, पिग्मेंटेशन या समस्या वारंवार आढळणाऱ्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो सहायक आहे. या साठी टोमॅटोच्या जाडसर चकत्या करून घ्याव्या. या चकत्यांवर थोडेसे मध घालून या चकत्या चेहऱ्यावर सावकाश गोलाकार फिरवाव्यात. हा उपाय काही दिवस दररोज केल्याने त्वचेवरील रंध्रे खुली होतात. तसेच चेहऱ्यावर मुरुमे-पुटकुळ्या पसरविणारे बॅक्टेरियाही यामुळे नाहीसे होतात. त्याचप्रमाणे त्वचेवरील पिग्मेंटेशन नाहीसे होऊन निस्तेज झालेली त्वचा सुंदर आणि नितळ होऊ लागते.
skin2
त्वचा सुंदर बनविण्यासाठी आणखी एक उपाय आहे, अळशीच्या बिया वापरून बनविलेले जेल. हे जेल तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे स्वच्छ पाणी घ्यावे. त्यामध्ये अर्धा चमचा अळशीच्या बिया घालाव्यात. मध्यम आचेवर हे मिश्रण उकळण्यास ठेवावे. हे मिश्रण काही वेळ उकळू दिल्यानंतर त्यावर पांढरा फेस दिसून येऊ लागतो, आणि हे मिश्रण दाटही होऊ लागते. तेव्हा हे मिश्रण आचेवरून खाली काढून घ्यावे आणि थंड होऊ द्यावे. हे मिश्रण थंड झाल्यांनतर एका स्वच्छ सुती कपड्यातून गाळून घ्यावे. हे गाळलेले जेल घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. हे मिश्रण फ्रीजमध्ये एक महिन्यापर्यंत चांगले राहते. हे जेल वापरण्यासाठी कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर पसरून पंधरा ते वीस मिनिटे राहू द्यावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा. या जेलच्या वापराने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment