वजन घटविण्यासाठी ‘पीनट बटर’ उपयुक्त

penut
सँडविचमध्ये लावण्यासाठी एक अतिशय पौष्टिक ‘स्प्रेड’ म्हणून ‘पीनट बटर’, म्हणजेच शेंगदाण्यांपासून तयार केले गेलेले बटर अतिशय लोकप्रिय होऊ लागले आहे. अतिशय पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण असे पीनट बटर वजन घटविण्यासाठीही उपयुक्त असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. पीनट बटर मध्ये असणारी प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार वजन घटविण्यास सहायक आहेत. पीनट बटरच्या सेवनाने भूक लवकर शमत असून, त्यामुळे अन्नाचे सेवन आपोआपच कमी होते. याच्या सेवनाने शरीराची चयापचय शक्ती वाढत असून, त्यामुळेही वजन घटण्यास मदत होते.
penut1
पीनट बटर पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा गव्हापासून तयार केलेल्या ब्रेडसोबत खाता येऊ शकते. फळे किंवा कच्च्या भाज्यांच्या कापांच्या सोबतही हे बटर खाता येते. सकाळच्या नाश्त्यामध्ये ओटमील घेत असल्यास किंवा दह्यामध्ये मिसळूनही पीनट बटरचे सेवन करता येते. मात्र वजन घटविताना पीनट बटर आहारामध्ये समाविष्ट करताना त्यामध्ये इतर ‘अॅडीटिव्ह’ असणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.
penut2
पीनट बटर बाजारातून आणण्यापेक्षा घरी तयार करणे अधिक चांगले. हे बटर बनविण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यावेत आणि त्यांची साले काढून घ्यावीत. त्यानंतर शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून त्यावर थोडेसे शेंगदाण्याचे तेल घालावे, त्यानंतर मिक्सर सुरु करून शेंगदाणे तीन ते चार मिनिटे मिक्सरवर वाटावेत. तयार झालेल्या शेंगदाण्याच्या पेस्टला पीनट बटर म्हटले जाते. यामध्ये चवीला थोडेसे मीठ घालावे. तसेच आवडत असल्यास किंचित मध आणि दालचिनीची पूड ही यामध्ये घालता येऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment