तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे हे सांगते तुमच्या हातांच्या बोटांची ठेवण

hand
तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उघड करणाऱ्या निरनिराळ्या गोष्टी असतात. तुमच्या आवडीनिवडी, तुमचे आवडते रंग, तुमची रास, तुमची जन्मतारीख इत्यादी गोष्टींवरून तुमचे व्यक्तिमत्व नेमके कसे आहे हे सांगता येऊ शकते. या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त तुमच्या हातांच्या बोटांची ठेवण देखील तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगून जाणारी आहे. हातांच्या बोटांच्या ठेवणीवरून व्यक्तिमत्वाचे कोणते पैलू स्पष्ट होतात हे जाणून घेऊ या.
hand1
आपल्या हाताला अंगठा सोडून आणखी चार बोटे असतात. पहिल्या बोटाला तर्जनी, दुसऱ्याला मध्यमा, तिसऱ्या बोटाला अनामिका तर चौथ्या बोटाला, म्हणजेच करंगळीला कनिष्ठा म्हटले गेले आहे. ज्या व्यक्तींच्या हातांची सर्वच बोटे लांबसडक असतात, त्या व्यक्ती इतरांच्या कामामध्ये सतत दखल देणाऱ्या, ढवळाढवळ करणाऱ्या असतात. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ हे धोरण या व्यक्तींच्या बाबतीत कमीच दिसून येते. ज्या व्यक्तींची बोटे लांबसडक पण नाजूक, पातळ असतात, त्या व्यक्ती अतिशय हुशार असतात. त्यांना दिलेले कोणत्याही प्रकारचे काम चोखपणे पार पाडण्याचे कसब त्यांच्या अंगी असते.
hand2
ज्या व्यक्तींच्या हातांची बोटे बुटकी, किंवा लहान असतात, अश्या व्यक्ती अतिशय समजूतदार समजल्या जातात. कोणत्याही प्रश्नांवर तोडगा काढताना आततायीपणा न करणाऱ्या अश्या या व्यक्ती अतिशय विवेकी असतात. त्यांच्यावर सोपविलेले प्रत्येक काम अतिशय निष्ठेने आणि मेहनतीने करणाऱ्या अश्या या व्यक्ती आहेत. अश्या व्यक्ती कठीण परिस्थीतीला घाबरून न जाता, मोठ्या धैर्याने परिस्थितीला तोंड देणाऱ्या असतात. ज्या व्यक्तींच्या हाताचे पहिले बोट, म्हणजेच तर्जनी इतर बोटांच्या मानाने काहीशी मोठी असते, अश्या व्यक्ती हट्टी, आपले तेच खरे करण्याच्या स्वभावाच्या असतात. या व्यक्तींना भविष्याची फारशी चिंता नसून आला दिवस आनंदाने जगणाऱ्या असतात. या व्यक्तींना मानसिक तणाव कस तो ठाऊकच नसतो. अश्या व्यक्ती कोणतीही गोष्ट फारशी गांभीर्याने घेत नाहीत.
hand3
जर हाताची सर्व बोटे ताठ ठेवली आणि तरीही कोणत्याही दोन बोटांमध्ये फट दिसत असली, तर अश्या व्यक्ती खर्चिक स्वभावाच्या समजल्या जातात. यांच्याकडे पैसा आला, तरी तो फारसा टिकून रहात नाही. तसेच ज्या व्यक्तींच्या हाताची करंगळी, म्हणजेच कनिष्ठा काहीशी वाकडी आणि बुटकी असते, त्या व्यक्ती स्वभावाने अतिशय उतावळ्या असतात. कुठलीही गोष्ट त्यांना अगदी झटपट व्हावी, किंवा मिळावी असे वाटत असून, कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहणे यांना आवडत नाही. अश्या व्यक्तींमध्ये प्रामाणिकपणा देखील काहीसा कमी आढळतो.

Leave a Comment