ग्रीन टी प्रमाणेच ग्रीन कॉफी देखील आरोग्यासाठी लाभदायक

coffee
सकाळी उठल्यावर वाफाळत्या कॉफीचा कप कोणाला नकोसा असेल? विशेषतः थंडीमध्ये किंवा पावसाच्या दिवसांमध्ये कॉफी मिळाली की मोसमाचा आनंद आणखीनच वाढतो, आणि शरीराची मरगळ दूर होऊन शरीरामध्ये नवे चैतन्य येते. पण केवळ शरीराची मरगळ दूर करणे आणि शरीरामध्ये चैतन्य निर्माण करणे एवढ्यापुरताच कॉफीचा उपयोग नाही. कॉफीचे सेवन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायद्याचे ठरण्यासाठी ग्रीन टी प्रमाणेच ग्रीन कॉफीचे सेवन करणे गरजेचे आहे. कॉफीच्या बिया भाजण्याच्या आधी हिरव्या असतात. याच बियांपासून तयार केली गेलेली कॉफी उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. ही कॉफी आरोग्याच्या दृष्टीने कश्याप्रकारे उपयोगी आहे हे जाणून घेऊ या.
coffee1
ग्रीन कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण कमी असते. तसेच यामध्ये असलेले क्लोरोजेनिक अॅसिड वजन घटविण्यास सहायक आहे. या तत्वामुळे शरीराच्या चयापचय शक्तीला चालना मिळत असून, शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील साठून राहिलेले ग्लुकोज आणि चरबीचे प्रमाण या कॉफीच्या सेवानाने कमी होऊ लागते. त्यामुळेच संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांच्या जोडीने ग्रीन कॉफीचे सेवन वजन घटविण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.
coffee2
क्लोरोजेनिक अॅसिडमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असून यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. या मुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ग्रीन कॉफीच्या बिया कच्च्या आणि कोणत्याही प्रक्रिया केलेल्या नसल्यामुळे यांच्यामध्ये अँटी ऑक्सिडंटस् चे प्रमाण अधिक असते. म्हणूनच ग्रीन कॉफीच्या सेवनाने शरीरावर हानिकारक फ्री रॅडीकल्सचा प्रभाव कमी होतो. तसेच ग्रीन कॉफीमध्ये असणारे राहिडिक अॅसिड त्वचेला आर्द्रता प्रदान करणारे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment