२०२१ वर्षात या ठरल्या देशातील १० श्रीमंत महिला

जगभरात विविध वेळा श्रीमंत लोकांच्या याद्या विविध संस्थांकडून प्रसिद्ध होतात पण बरेच वेळा त्यात श्रीमंत पुरुष यांचाच उल्लेख दिसतो. श्रीमंती मध्ये भारतीय महिलाही पुरुषांच्या तुलनेत मागे नाहीत हे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका श्रीमंत महिला यादीवरून दिसून आले आहे. यातील पहिल्या १० महिला खालीलप्रमाणे आहेत.

सावित्री जिंदाल- या २०२१ सालातल्या सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत. जिंदाल समूहाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि ७१ वर्षीय सावित्री जिंदाल यांची संपत्ती आहे १८ अब्ज अमेरिकन डॉलर्स. या यादीत दोन नंबरवर आहेत हॅवेल्स इंडियाच्या प्रमुख विनोद राय गुप्ता. त्यांच्या ४० देशात व्यवसाय शाखा असून विनोद राय यांची संपत्ती आहे  ७.६ अब्ज डॉलर्स. ३ नंबरवर फाल्गुनी नायर असून ब्युटीस्टार्टअप नायकाच्या त्या संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आहे ६.५ अब्ज डॉलर्स.

या यादीत चार नंबरवर एचसीएल एन्टरप्रायझेसच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा या आहेत. त्यांची संपत्ती आहे ४.९ अब्ज डॉलर्स. पाचव्या स्थानी दिव्या गोकुलनाथ असून त्या बायजू फौंडेशनच्या संस्थापक आहे. पती बायजू रवीन्द्रन यांच्यासह त्यांनी या फौंडेशनची २०११ स्थापना केली असून त्यांची संपत्ती आहे ४.५ अब्ज डॉलर्स. फार्मा कंपनी युएसव्ही इंडियाच्या अध्यक्ष लीना तिवारी या यादीत सहाव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती आहे ४.४ अब्ज डॉलर्स. बायोकोनच्या संस्थापक अध्यक्ष किरण शॉ मुझुमदार या यादीत सातव्या स्थानी असून त्यांची संपत्ती ३.९ अब्ज डॉलर्स आहे.

कृषी मशिनरी ट्रॅक्टर्स फार्म इंडिया लिमिटेड म्हणजे टीएएफईच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मल्लिका श्रीनिवासन या यादीत आठव्या स्थानी असून त्यांची संपत्ती २.८९ अब्ज डॉलर्स आहे. या यादीत नवव्या क्रमांकावर डीवी लॅबॉरेटरीच्या डायरेक्टर नीलिमा मोटापर्ती असून त्यांची संपत्ती २.४ अब्ज डॉलर्स आहे. दहाव्या स्थानी राधा वेंबू असून सॉफ्टवेअर प्रोडक्शन बनविणाऱ्या जोहो कंपनीच्या त्या संचालक आहेत. त्यांची संपत्ती आहे १.८ अब्ज डॉलर्स.