ही लक्षणे असतील तर करा ओमिक्रोन चाचणी

करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोन त्याच्या मागच्या डेल्टा व्हेरीयंट इतके धोकादायक नसले तरी त्याचा प्रसाराचा वेग डेल्टा पेक्षा अधिक असल्याचे आत्ता स्पष्ट झाले असून भारतावर सुद्धा करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका घोंगावू लागला आहे. ओमिक्रोनवर अजून पुरेसे संशोधन झालेले नसले तरी ९० टक्के संक्रमितात दिसलेली लक्षणे बरीचशी सारखी आहेत. याची काही लक्षणे करोना सारखी पण काही पूर्ण वेगळी आहेत. त्यामुळे  वेगळी लक्षणे जाणवली तर ओमिक्रोनसाठी चाचणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ओमिक्रोनचा संसर्ग आहे का याचा अंदाज या वेगळ्या लक्षणांवरून त्वरित येऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. सर्वसाधारण फ्ल्यू सारखी ही लक्षणे आहेत आणि ९० टक्के संक्रमितांत ती दिसली आहेत. अमेरिकन रिसर्च टीम नुसार कोरडा खोकला आणि घसा उकलणे हे ९० टक्के संक्रमितात कॉमन लक्षण आहे. अन्य काही लक्षणात चक्कर येणे, सर्दी होणे, नाक वाहणे या सारख्या समस्या आहेत पण त्या अगदी सौम्य स्वरुपात आहेत.ओमिक्रोन रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करतो असेही दिसून आले आहे.

ओमिक्रोनचे सर्वप्रथम निदान केलेल्या डॉ. कॉएट्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार द. आफ्रिकेत ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नव्हता त्यांच्यात ओमिक्रोन संसर्गात तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे ही लक्षणे दिसली. या लक्षणांबरोबर जर खोकला, अंगदुखी असेल तर त्वरित चाचणी करून घेणे हितकारक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही