हार्दिक पांड्याच्या वापसीसाठी करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या फिटनेस बाबत सतत काही ना काही ऐकू येत आहे. २०२१ वर्ष हार्दिक साठी वाईट ठरले आहे. आयपीएल २०२१ मध्ये हार्दिक फेल ठरला आणि टी २० वर्ल्ड कप मध्येही त्याने काही खास कामगिरी बजावलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया सुपर १२ राउंड बाहेर त्याला जावे लागले असून त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ साठी हार्दिकला रिटेन केलेले नाही.

हार्दिक अजूनही फिट नाही त्यामुळे त्याच्या वापसीसाठी आणखी किमान दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल असे संकेत दिले गेले आहेत. इनसाईडच्या रिपोर्ट नुसार बीसीसीआयने हार्दिकला एनसीए मध्ये यायला सांगितले आहे. तेथे तज्ञांच्या सोबत त्याच्या बोलिंग फिटनेसवर काम केले जाईल. त्यामुळे तो ६ ते २० फेब्रुवारी या काळात वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वन डे टी २० सिरीज बाहेर राहू शकतो. त्याचबरोबर हार्दिकने बोलिंग मधील फिटनेस शाबित केल्यावर त्याला स्थानिक क्रिकेट मध्ये खेळावे लागेल असे सांगितले आहे.

आयपीएल २०२२ चे मेगा ऑक्शन जानेवारी फेब्रुवारी मध्ये होणार आहेत. त्यात हार्दिकच्या व्हॅल्युवर परिणाम होऊ शकतो. २०१७ मध्ये हार्दिक प्रथम मुंबई इंडियन्स मध्ये सामील झाला आणि तेव्हापासून तो तेथूनच खेळला आहे. सात सिझन मध्ये त्याने ९२ सामने खेळताना १५४ च्या स्ट्राईक रेटने १४७६ धावा आणि ४२ विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सने त्याला सुरवातीला १० लाखात खरेदी केले होते मात्र २०१८ पासून त्याची किंमत ११ कोटींवर गेली होती. आता पुन्हा इतकी किंमत हार्दिकला मिळणे अवघड असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.