जपान मधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच का आढळतो?

japan
वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्च नुसार जगातील सर्व देशांपैकी जपान देशामधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच आढळून येतो. या देशातील रहिवासी अतिशय सडपातळ बांध्याचे आणि दिघार्युषी आहेत. त्या उलट जगातील इतर देशांमध्ये एकूण जन्संख्येपैकी सुमारे पंधरा ते तीस टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा दिसून येत असताना, जपानमध्ये मात्र हे प्रमाण केवळ ३.६ % इतकेच आहे. या लोकांच्या सडपातळ बांध्यामागे आणि वजन प्रमाणाबाहेर न वाढण्यामागे काय रहस्य आहे, हे जाणून घेऊ या.
japan1
जपान देशातील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावाने आढळण्यामागचे सर्वात मोठे रहस्य त्यांच्या आहारामध्ये आहे. या लोकांच्या आहारामध्ये कर्बोदाकांचे प्रमाण अधिक असून, सॅच्युरेटेड फॅटस् चे प्रमाण अतिशय कमी असते. जपानी आहार पद्धतीमध्ये मुख्य समावेश ताज्या भाज्या, धान्य आणि मासे आणि इतर मांस यांचा असतो. फळे आणि दुध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश जपानी आहारपद्धतीमध्ये अतिशय मर्यादित प्रमाणामध्ये केला जात असतो. तसेच मिठाचे किंवा साखरचे प्रमाण जास्त असलेल्या प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे सेवनही हे लोक अतिशय कमी करीत असतात. जपान सरकारच्या वतीने आहारपद्धती कशी असावी याबद्दल मार्गदर्शन करणारी नियमावली तयार केली गेली असून, बहुतेक सर्वच नागरिक या नियमांचा अवलंब करताना दिसतात. या आहारपद्धतीमध्ये घरी शिजविलेले ताजे अन्न सेवन करण्याला मोठे महत्व दिले गेले आहे. तसेच प्रोसेस्ड किंवा फ्रोझन अन्नपदार्थ न वापरण्याकडे या लोकाचा कल अधिक आहे.
japan2
या देशामध्ये ठीकठिकाणी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारी व्हेंडिंग मशीन्स पहावयास मिळत असली, तरी या देशातील लोक जेवणाच्या वेळा सोडून एरव्ही मधल्या वेळेला काही खाताना आढळत नाहीत. जपानी आहारपद्धतीमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन आणि रात्रीचे भोजन हीच भोजने महत्वाची असून या व्यतिरिक्त मधल्या वेळेला काही खाण्याची पद्धत इथे दिसून येत नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच जपानी लोक देखील त्यांच्या कामामध्ये अतिशय व्यस्त असून, अनेकांना घरी जेवण तयार करण्यासाठी देखील वेळ काढणे शक्य होत नाही. अश्या वेळी बाहेर मिळणाऱ्या फास्ट फूडचे सेवन करण्यापलिकडे इतर कोणता पर्याय उपलब्ध नसतो. पण त्यासाठी फास्ट फूडमध्ये पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, सोडा युक्त पेये, बर्गर्स असल्या पदार्थांची निवड न करता हे लोक जपानी फास्ट फूड निवडतात. जपान मध्ये फास्ट फूडची कल्पना वेगळी असून, या ठिकाणी उपलब्ध असणारे फास्ट फूड संपूर्णपणे नैसर्गिक आणि ताजे पदार्थ वापरून बनविले जात असते.

जपानमध्ये कुठे ही जायचे असले, तरी तिथे चालत जाणे किंवा सायकलचा वापर करणे हे लोक पसंत करतात. या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी असून, अगदी निर्जन ठिकाणी देखील पायी चालणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा धोका अभावानेच संभवतो. तसेच या ठिकाणी पायी चालणाऱ्या आणि सायकलने जाणाऱ्या लोकांसाठी खास ट्रॅक सर्वत्र उपलब्ध असल्याने वाहनांच्या गर्दीची चिंता न करता हे लोक पायी चालणे पसंत करतात. यामुळे आवश्यक तितका व्यायाम आपोआपच मिळतो. जपानी भोजनाची पद्धत पाहता सर्व अन्न एकदमच समोर न ठेवता अनेक लहान लहान बश्यांमध्ये भरून ठेवले जाते, तसेच खाताना चॉपस्टिक्स चा वापर केला जातो. चॉपस्टिक्सने अन्न उचलून खाताना आपोआपच अन्नाचे लहान लहान घास घेतले जातात, आणि जेवणाचा वेग ही कमी असतो. यामुळे मर्यादेपेक्षा जास्त अन्न सेवन केले जाण्याची शक्यता आपोआपच कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment