भेट देऊ या अॅमस्टरडॅम येथील ‘कार स्मॅश’ यार्डला

car
लोक आपला राग व्यक्त करण्याच्या हेतूने, किंवा आपले नैराश्य व्यक्त करण्याच्या हेतूने अनेकदा वस्तूंची तोडफोड करीत असलेले आपण अनेकदा पाहतो, किंवा असे काही किस्से आपल्या कानी पडत असतात. किंबहुना मनामध्ये साठलेला राग किंवा नैराश्याच्या भावनेला वाट करून देण्यासाठी पंचिंग बॅगचा उपयोग करावा असा सल्ला मानसशास्त्रज्ञ देतात, जेणेकरून शारीरिक श्रमामुळे मनातील रागाची भावना कमी होईल. नेदरलँड्स देशातील अॅमस्टरडॅम येथे पंचिंग बॅगचे पुढचे पाउल म्हणता येईल असे ‘कार स्मॅश’ यार्ड तयार करण्यात आले आहे.
car1
या यार्डमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व कार्स या अतिशय जुन्या पुराण्या, टाकाऊ कार्स असून, त्या नष्ट करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्याप्रमाणे पंचिंग बॅगला मारून एखादी व्यक्ती तिच्या मनातील रागाला वाट करून देऊ शकते, त्याचप्रमाणे या कारची तोडफोड करून येथे येणाऱ्या व्यक्ती आपल्या मनामधील अस्वस्थता दूर करु शकतात. येथे येणाऱ्या व्यक्तींना आवश्यक त्याप्रमाणे मोठमोठे हातोडे, बॅट इत्यादी आयुधे देण्यात येत असून, एक जुनी, टाकाऊ कार त्यांच्या हवाली केली जाते. या कारवर हातोड्यांनी हवे तसे प्रहार करून, कारची मोडतोड करून लोक आपल्या मनातील रागाच्या किंवा नैराश्याच्या भावनांना वाट करून देत असतात.
car2
येथे पुरविण्यात येत असलेल्या हातोडा, बॅट इत्यादी वस्तूंच्या मदतीने सहभागी झालेल्या व्यक्ती त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे करची मोडतोड करू शकतात. एक अनोखे ‘अॅडव्हेन्चर स्पोर्ट’ म्हणून या ठिकाणी हा प्रकार लोकप्रिय होत असताना पहावयास मिळत आहे.

Leave a Comment