केसांच्या उत्तम वाढीसाठी अळशीच्या बिया उपयुक्त

seed
केस गळणे, केस टोकांशी दुभंगणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस राठ, कोरडे होणे या समस्या प्रत्येक जण कधी ना कधी अनुभवत असतो. तसेच एकदा गळून गेलेले केस पुन्हा वाढणे ही प्रक्रिया देखील अतिशय वेळ घेणारी असते. त्यासाठी आपण वेळोवेळी अनेक उपाय देखील करीत असतो. यामध्ये अनेक तऱ्हेच्या घरगुती उपायांचाही समावेश आहे. यांमध्ये केसांची उत्तम वाढ व्हावी या करिता उत्तम उपाय म्हणजे अळशीच्या बियांचा वापर.
seed1
अळशीच्या बियांमध्ये इ जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये आहे. इ जीवनसत्व केसांच्या वाढीकरिता अतिशय महत्वाचे तत्व आहे. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सिडंटस् चे प्रमाणही भरपूर आहे. या सर्व तत्वांमुळे केसांची मुळे बळकट होत असून, त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच केसांच्या मुळांशी असलेल्या कोशिका सक्रीय होऊन रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. इ जीवनसत्व, केसांचे अकाली पांढरे होणेही रोखणारे आहे.
seed2
अळशीच्या बियांमुळे केसांचा तेलकटपण नियंत्रित रहात असून, ‘पीएच लेव्हल्स’ही संतुलित राहण्यास मदत होते. केसांच्या मुलांशी ‘सेबेकस’ ग्रंथी असून या ग्रंथींमधून केसांसाठी आवश्यक तेल तयार केले जात असते. जर या ग्रंथी अधिक सक्रीय असल्या तर केस खूपच तेलकट दिसू लागतात. अळशीमुळे या ग्रंथी संतुलित राहण्यास मदत होते. अळशीमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्सही मुबलक प्रमाणामध्ये आहेत. ही तत्वे उत्तम केसवाढीकरिता आवश्यक आहेत. यांच्यामुळे केसांचे फॉलीकल्स बळकट होतात. तसेच केसांना आवश्यक पोषण देण्याचे काम ही ओमेगा थ्री करतात.
seed3
अळशी केसांना ‘कंडिशन’ करण्याचे काम करते. यामुळे केस अतिशय मुलायम राहतात, तसेच केसांचा कोरडेपणा नाहीसा होतो. त्यामुळे केस तुटणे, केस दुभंगणे, या समस्या देखील दूर होतात. ज्यांना केसांच्या मुळांशी सतत खाज सुटते, किंवा केसांमध्ये वारंवार कोंडा होतो, अश्यांनीही अळशीच्या बियांचा वापर करावा. उत्तम केसवाढीसाठी अळशीचा वापर निरनिरळ्या प्रकारे करता येईल. बाजारामध्ये अळशीचे तेल उपलब्ध आहे. हे तेल कोमट करून घेऊन या तेलाने केसांना मालिश करावी. केसांच्या मुळांशी देखील हलक्या हाताने मालिश करावी. केसांना मालिश करून झाल्यानंतर केसांच्या भोवती गरम पाण्यामध्ये भिजवून पिळून काढलेला टॉवेल गुंडाळावा. या टॉवेलच्या उबेमुळे तेल केसांच्या मुळांशी शोषले जाण्यास मदत होते. हा टॉवेल अर्धा तास केसांवर ठेवायचा आहे. त्यानंतर एखाद्या चांगल्या शँपूने नेहमीप्रमाणे केस धुवून टाकावेत. आठवड्यातून तीन वेळा या तेलाने केसांना मालिश करावी.
seed4
अळशीच्या तेलाप्रमाणे अळशी पासून बनविलेल्या जेलचा वापरही करता येईल. हे जेल तयार करण्यासाठी पाव कप अळशीच्या बिया, दोन कप पाणी आणि एक मोठा चमचा लिंबाचा रस या साहित्याची आवश्यकता आहे. दोन कप पाण्यामध्ये अळशीच्या बिया घालून उकळी काढावी. हे मिश्रण साधारण तीन ते चार मिनिटांनी दाट होऊ लागते. हे मिश्रण आटू लागताच गॅस बंद करावा आणि मिश्रणामध्ये लिंबाचा रस मिसळावा. त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यांनतर हे मिश्रण गाळून घेऊन बरणीमध्ये भरून ठेवावे. हे मिश्रण दररोजही ‘स्टायलिंग जेल’ म्हणून वापरता येऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment