आजमावून पहा असे ही घरगुती उपाय

charm
काही घरगुती उपाय इतके अजब असतात, की ते खरोखरच लागू पडतात किंवा नाही अशी शंका मनामध्ये नक्कीच उभी राहते. पण हे घरगुती उपाय अनेकांनी वर्षानुवर्षे आजमावलेले असून, शंभर टक्के उपयुक्त असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. असे हे काही घरगुती उपाय जाणून घेऊ या.
charm1
* दिवसभर पावले बुटांमध्ये बंद राहत असली, तर पावलांना एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या जास्तच जाणवते. अश्या वेळी थोडेसे अल्कोहोल एका कपड्यावर घेऊन त्याने पावले स्वच्छ पुसून काढावीत. यामध्ये असलेल्या अँटी सेप्टिक गुणांमुळे पावलांची दुर्गंधी त्वरित नाहीशी होते.
charm2
* सतत चहा-कॉफीच्या सेवनाने दात पिवळसर दिसू लागतात. दातांना त्वरित शुभ्र बनवायचे असल्यास लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा (खाण्याचा सोडा) यांच्या मिश्रणाचा वापर करावा. लिंबाचा रस आणि खाण्याचा सोडा एकत्र करून त्याची पेस्ट बनवून दातांवर लावावी आणि एक मिनिटाकरिता राहू द्यावी. त्यानंतर नेहमीप्रमाणे दात ब्रश करावेत. हे मिश्रण दातांवर लावल्याने दातांचा पिवळसरपणा जाऊन दात शुभ्र होण्यास मदत होते. दात शुभ्र राहण्यासाठी हे मिश्रण आठवड्यातून एकदा दातांवर लावावे.
charm3
* केसांमधील कोंडा कमी होत नसल्यास एक अॅस्पिरीनची गोळी दोन चमचे शँपूमध्ये मिसळून या शँपूने केस धुवावेत. हा शँपू केसांच्या मुळांशी चांगला चोळून लावावा आणि त्यांनतर केसांवर पाच मिनिटे राहू द्यावा. त्यानंतर केस धुवून टाकावेत. अॅस्पिरीनच्या गोळीमध्ये सॅलीसायलिक अॅसिड असते. हे तत्व केसांमधील कोंडा कमी करण्यास सहायक आहे.
charm4
* सतत पाण्यामध्ये हात राहत असल्याने, किंवा पुरेसे पोषण मिळत नसल्याने अनेकदा नखे ठिसूळ होऊन तुटू लागतात. ही समस्या उद्भवल्यास दररोज रात्री झोपण्यापूर्वी नखांना तेलाची मालिश करावी. यासाठी रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरण्याच्या तेलाचा वापरही करता येऊ शकेल. तेलाने मालिश केल्यानंतर हातांवर प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवावी. यामुळे हातांना लावलेले तेल नखांच्या मुळांशी शोषले जाऊन नखांना पोषण मिळते आणि नखे तुटणे कमी होते.
charm5
* जर चेहऱ्याची त्वचा कोरडी पडत असेल, तर ती पुन्हा मुलायम बनविण्याकरिता चॉकोलेट मास्क उपयुक्त ठरतो. हा मास्क बनविण्यासाठी पन्नास ग्राम चॉकोलेट वितळवून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून वीस मिनिटे राहू द्यावे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. या मास्क च्या मदतीने त्वचा मुलायम, नितळ बनते.

Leave a Comment