तुमची रास आणि तुमच्या राशीसाठी लाभदायक वृक्ष

tree
ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशी सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहमानावरून त्या व्यक्तीची रास ठरत असते. राशीवरून व्यक्तीचे स्वभावविशेष, त्याचे व्यक्तिमत्व कसे असेल, याचे अनेक अचूक अंदाज ज्योतिष्यांना बांधता येणे शक्य होते. तसेच प्रत्येक राशीवरून त्या व्यक्तीला लाभणारे रत्न, रंग, याबद्दलही मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र करीत असते. ज्याप्रमाणे प्रत्येक राशीसाठी काही ठराविक रंग किंवा रत्ने लाभदायी असतात, त्याचप्रमाणे राशींचा संबंध काही ठराविक वृक्षांशी देखील जोडण्यात येत असतो. ठराविक राशीच्या व्यक्तीने त्या त्या राशीला अनुकूल असलेला वृक्ष लावला आणि जतन केला, तर हा वृक्ष त्याच्यासाठी लाभदायी ठरत असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. तेव्हा कोणत्या राशीसाठी कोणते वृक्ष अनुकूल आहेत हे जाणून घेऊ या. या ठिकाणी वृक्षांची माहिती पत्रिकेनुसार असलेल्या राशीप्रमाणे न देता महिन्यांच्या अनुसार, म्हणजेच ‘sun signs’ प्रमाणे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जन्माच्या तारखेनुसार आपली रास कोणती हे पाहून त्यानुसार वृक्षाची माहिती पहावयाची आहे.
tree1
मार्च २१ ते एप्रिल १९ या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्तींची रास मेष (Aries) आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी रेड सँडलवूड, अनंत मूळ, आणि खेर हे वृक्ष अनुकूल आहेत. एप्रिल २० ते मे २० या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्तींची रास वृषभ (taurus) असून या व्यक्तींसाठी सप्तपर्णी, मोगरा, औदुंबर आणि पपई हे वृक्ष अनुकूल आहेत. मिथुन रास (gemini) २१ मे ते जून २० या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्तींची असून, अॅलो व्हेरा या राशीसाठी अनुकुल समजली जाते. २१ जून ते २२ जुलै या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्ती कर्क (cancer) राशीच्या असून या राशीसाठी पळस, आणि पांढरी फुले येणारे सर्व वृक्ष लाभदायी समजले जातात. २२ जुलै ते २२ ऑगस्ट या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्ती सिंह (leo) राशीच्या असून, बेल, कालगरी किंवा पाडळ आणि रुई या राशीला अनुकूल आहेत.
tree2
कन्या रास,(virgo) २३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्तींची रास असून, या व्यक्तींकरिता आंबा, अॅलो व्हेरा अनुकुल आहेत. २३ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबरच्या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्ती तूळ राशीच्या (libra) असून, या राशीसाठी बकुल, औदुंबर, मोगरा आणि सफेद फुले येणारे सर्व वृक्ष अनुकूल आहेत. ऑक्टोबर २३ ते नोव्हेंबर २१ या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्तींची रास वृश्चिक (scorpio) असून, अनंत मूळ आणि खेर हे वृक्ष या राशीला अनुकूल आहेत. धनु राशीच्या व्यक्ती (sagittarius) २२ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या काळामध्ये जन्मलेल्या असून केळी, आंबा आणि पिंपळ या राशीसाठी अनुकूल वृक्ष आहेत. २२ डिसेंबर ते १९ जानेवारी या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्तींची रास मकर (capricorn) असून, या राशीसाठी शिशम, शमी, आणि कडूनिंब हे वृक्ष अनुकूल आहेत. कुंभ राशीच्या (aquarius) व्यक्तींचा जन्म २० जानेवारी ते १८ फेब्रुवारी या काळातला असून, या राशीसाठी शमी, कडूनिंब, आणि शिशम हे वृक्ष अनुकूल आहेत. फेब्रुवारी १९ ते २० मार्च या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्तींची रास मीन (pisces) असून, या राशीच्या व्यक्तींसाठी वड, पिंपळ, केळी आणि आंब्याचे वृक्ष शुभ फल देणारे आहेत.

Leave a Comment