कोविड लसीकरण दोन डोस घेणाऱ्याना मिळणार बॅज सुद्धा

भारत सरकारच्या कोविन पोर्टलवर नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात कोविड १९ लसीकरण सर्टिफिकेट बरोबरच लसीकरण स्थिती दर्शविणारा बॅज सुद्धा मिळू शकणार आहे. हा बॅक युजर्स सोशल मिडीयावर शेअर करू शकणार आहेत. कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरणांसाठी नोंदणी करण्यापासून ते लसीकरण झाल्यावर सर्टिफिकेट डाऊन लोड करण्यापर्यंत सर्व कामे करता येतात.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी ट्वीटर वरून दिलेल्या माहितीनुसार कोविन उपयोगकर्त्याच्या कोविड १९ लसीकरण स्थितीसह पूर्ण किंवा आंशिक पद्धतीने लसीकरण बॅज दाखवेल. ढाल स्वरुपात हा बॅज दिसेल आणि युजर्स स्मार्टबॅज डाऊनलोड करून सोशल मिडीयावर शेअर करू शकतील. त्यासाठी cowin. gov.in वर जाऊन रजिस्टर मोबाईल नंबर साईन केले कि शिल्ड दिसेल.

भारताने कोविन प्लॅटफॉर्म पूर्ण जगभर मोफत देण्याची तयारी दाखविली आहे. जुलै कोविन ग्लोबल कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात घोषणा केली होती. त्यात मोदी यांनी कोविड १९ लसीकरण साठी ओपन सोर्स प्लॅटफॉर्म बनविला जाईल आणि कुणाही देशाला त्याचा वापर त्यांच्या देशातील लसीकरण मोहिमेसाठी करता येईल असे सांगितले होते. या प्लॅटफॉर्मवर किती काळात किती लसीकरण झाले हे ट्रॅक करता येतेच पण किती लस वाया गेली हेही ट्रॅक करता येते.